Google Pixel सीरिजमध्ये ₹49,000 पर्यंत घसघशीत सवलत, 8 Pro आणि 7A सारखे फोन स्वस्तात खरेदीची संधी!

Published on -

जर तुम्ही Google Pixel फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, पण त्याची किंमत तुमच्या बजेटच्या बाहेर गेली असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी आनंददायक आहे. ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart सध्या Google Pixel सीरिजवर भरीव सूट देत आहे. Pixel 8 Pro सारखा हाय-एंड फोन जवळपास ₹49,000 सवलतीसह खरेदी करता येतो. तसेच Pixel 7A, 8, 9A आणि इतर मॉडेल्सही कमी दरात उपलब्ध आहेत. बँक आणि एक्सचेंज ऑफर्सचा वापर करून ही किंमत आणखी कमी करता येते. चला तर मग पाहूया कोणत्या मॉडेलवर किती सूट मिळते आहे.

Pixel 8A

Pixel 8A या मॉडेलची लाँचिंग किंमत ₹52,999 असून तो आता फक्त ₹37,999 मध्ये खरेदी करता येतो. म्हणजेच तब्बल ₹15,000 ची सूट मिळते आहे. 6.1 इंचाचा डिस्प्ले, Tensor G3 चिपसेट, 64MP कॅमेरा आणि 4404mAh बॅटरी ही याची खास वैशिष्ट्ये आहेत.

Pixel 7

Pixel 7 लाँचिंगच्या वेळेस ₹59,999 किंमतीचा हा फोन आता ₹30,999 मध्ये मिळतो आहे. म्हणजेच थेट ₹29,000 ची बचत. यात 6.3 इंच डिस्प्ले, 50MP कॅमेरा, Tensor G2 चिप आणि 4270mAh बॅटरी मिळते.

Pixel 7A

Pixel 7A ची लाँचिंग किंमत ₹43,999 असून सध्या तो फक्त ₹27,999 ला उपलब्ध आहे. 6.1 इंच डिस्प्ले, 64MP कॅमेरा, Tensor G2 चिप आणि 4300mAh बॅटरीसह हा फोन उत्कृष्ट पर्याय ठरतो.

Pixel 9A

Pixel 9A हे 256GB मॉडेल सध्या ₹49,999 मध्ये लिस्टेड आहे. यात 6.2 इंचाचा डिस्प्ले, 48MP कॅमेरा, नवीन Tensor G4 चिपसेट आणि 5100mAh बॅटरी दिली आहे.

Pixel 9

Pixel 9 सध्या ₹74,999 मध्ये उपलब्ध आहे, जो ₹79,999 च्या लाँच किंमतपेक्षा ₹5,000 स्वस्त आहे. यात 6.3 इंच डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि 4700mAh बॅटरी आहे.

Pixel 8 Pro

Pixel 8 Pro वर सर्वात मोठी डील सुरू आहे. लाँच किंमत ₹1,13,999 असलेला हा फोन सध्या फक्त ₹64,999 ला उपलब्ध आहे. म्हणजेच तब्बल ₹49,000 ची सूट. यात 6.7 इंच QHD+ डिस्प्ले, 50MP कॅमेरा, Tensor G3 चिप आणि 5050mAh बॅटरी आहे.

तसेच Pixel 8 लाँच किंमत ₹75,999 असून सध्या ₹44,999 ला उपलब्ध आहे. मात्र सध्या हा फोन आउट ऑफ स्टॉक आहे. या फोनमध्ये 6.2 इंच डिस्प्ले, Tensor G3 चिप आणि 4575mAh बॅटरी आहे.

या सर्व डील्समध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्या लोकेशननुसार (पिनकोडवर) स्टॉक आणि डिलिव्हरीची उपलब्धता वेगळी असू शकते. त्यामुळे ऑर्डर देण्यापूर्वी ते तपासून पाहा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!