घरात वारंवार आजारपण येत असेल, तर लगेच करा ‘हा’ वास्तू उपाय!

Published on -

घरात एखाद्याला आजारपण असेल आणि ते कितीही औषधं घेतली तरी काही फरक पडत नसेल, तर केवळ शरीरच नाही तर घराचं वातावरणही तपासण्याची वेळ आलेली असते. काही वेळा आपल्या लक्षातही येत नाही, पण घरातील काही वास्तु दोष असे असतात जे सतत नकारात्मक ऊर्जा निर्माण करत राहतात. हीच नकारात्मकता शरीर, मन आणि नात्यांवर खोल परिणाम करत असते.

आपण घरात देवपूजा करतो, स्वच्छता ठेवतो, पण जर वास्तुच्या काही मूळ त्रुटी राहून गेल्या तर त्याचा परिणाम सर्व कुटुंबावर दिसतो. उदाहरणार्थ, घराच्या मुख्य दरवाजासमोर असलेला खड्डा, पाणी साचलेली जागा किंवा सतत अस्वच्छता हे आजारांना आमंत्रण देतात. दरवाजातून घरात प्रवेश करणाऱ्या उर्जेवर हा अडथळा असतो आणि त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे या ठिकाणी नेहमी स्वच्छता राखणं, खड्डा मातीने बुजवणं आणि दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढणं हे आरोग्यासाठी आश्चर्यकारक फायदे देऊ शकतं.

जेवणाची दिशा

तसंच, आपण जेवताना कोणत्या दिशेला तोंड करून बसतो, हे ही महत्वाचं आहे. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवण केल्यास पचनसंस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. जर कोणाचं पचन खराब असेल, तर त्याच्या सवयींबरोबरच दिशेचा विचार करणेही गरजेचं ठरतं. योग्य दिशा आणि शांत, स्वच्छ वातावरणात जेवण केल्यास अन्न केवळ शरीरासाठीच नव्हे तर मनासाठीही औषध ठरतं.

घरासमोरील झाडं, खांबं किंवा त्यांची सावली जर घरावर पडत असेल, तर ती एक प्रकारची बंद ऊर्जा निर्माण करते. ती उर्जा घरातील वातावरणावर ताण आणते आणि मानसिक शांतता हिरावून घेते. अशा वेळी दरवाजाच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढणं, प्रकाश टाकणं किंवा दिवा लावणं या गोष्टी सकारात्मकतेचा प्रवाह परत आणतात.

बेडसमोर आरसा ठेवू नये

बेडरूममध्ये गोळा केलेल्या जुन्या वस्तूंमुळे ऊर्जा थांबते. त्या वस्तूंमध्ये अडकलेली स्मृती, काळजी, खिन्नता सतत वातावरणात फिरत असते. बेडरूम नेहमी हलकी, सुसंवादी ठेवली पाहिजे. बेडखाली काहीही न ठेवणं आणि बेडसमोर आरसा न ठेवणं या दोन गोष्टींचं विशेष पालन केल्यास मानसिक विश्रांती सुधारते.

आग्नेय कोपऱ्यात दिवा लावा

घराच्या आग्नेय कोपऱ्यात दररोज लाल बल्ब किंवा मेणबत्ती लावणं हा एक सोपा पण प्रभावी उपाय आहे. लाल रंग अग्नी तत्वाशी संबंधित असून, त्याचा संबंध आरोग्य आणि इच्छाशक्तीशी आहे. तो कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा आणि तिथे रोज काही क्षण ध्यान करावं, म्हणजे घरात सौंदर्य आणि आरोग्याचा संगम तयार होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!