आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये हृदयाच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणं अनेकांसाठी सामान्य झालं आहे. वाढलेला तणाव, चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि सततची घाई या सगळ्याचा परिणाम थेट आपल्या हृदयावर होतो. त्यामुळेच अनेकांना अगदी लहान वयातच हृदयविकाराचा त्रास जाणवतोय.

पण एक चांगली गोष्ट म्हणजे, काही विशेष भाज्यांच्या नियमित सेवनाने हृदयाला बळकट करता येतं. हृदय कमजोर असेल, सतत थकवा जाणवत असेल, किंवा हृदयविकाराचा धोका वाढत असल्यास, तुमच्या आहारात या 5 खास भाज्यांचा समावेश करा. त्याचा परिणाम इतका प्रभावी आहे की हृदयविकाराचा धोका तब्बल 10 पट कमी होऊ शकतो.
पालक भाजी
सुरुवात करा हिरव्या आणि पोषणयुक्त पालक भाजीपासून. ही भाजी लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. हे तिन्ही घटक हृदयाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. पालकात असलेले अँटीऑक्सिडंट्स धमन्यांमध्ये साचणारी चरबी स्वच्छ करण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि रक्तदाब नियंत्रणात येतो.
ब्रोकली
दुसरी पोषणयुक्त भाजी म्हणजे ब्रोकली. आजकाल ही भाजी भारतात सहज उपलब्ध होते. ब्रोकलीमध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन सी आणि सल्फोराफेन असते. हे घटक कोलेस्ट्रॉल कमी करतात, हृदयातील जळजळ रोखतात आणि संपूर्ण रक्तवाहिन्यांचं आरोग्य टिकवून ठेवतात. ती सूप, सॅलड किंवा सौम्य शिजवून सहजपणे खाल्ली जाऊ शकते.
टोमॅटो
तिसरी अत्यंत महत्त्वाची भाजी म्हणजे टोमॅटो. अनेकांना वाटतं टोमॅटो फक्त चव वाढवतो, पण त्यात असणारं लाइकोपीन हे एक ताकदवान अँटीऑक्सिडंट आहे जे हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी करतं. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदय मजबूत राहतं.
गाजर
गाजर ही अशी फळ भाजी आहे जी दिसायला सुंदर आणि खायलाही गोडसर लागते, पण तिच्या आरोग्यदायी गुणांचा विचार केला तर ती एक वरदान ठरते. गाजरात बीटा-कॅरोटीन आणि फायबर असते जे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते आणि रक्तदाब संतुलित करते. तुम्ही ती कच्ची, उकडून किंवा सूपमध्ये घेऊ शकता.
लसूण
शेवटी, एक छोटा पण अत्यंत प्रभावी घटक म्हणजे लसूण. लसणात असणारं अॅलिसिन रक्त पातळ करतं, त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तातील चरबीच्या गोळ्या बनण्याची शक्यता कमी होते. सकाळी उपाशीपोटी कच्चा लसूण खाणं हे हृदयासाठी फारच फायदेशीर मानलं जातं.