भारताची सर्वात श्रीमंत बालकलाकार, मानधन 10 कोटींच्याही पुढे; आता 40 वर्षीय अभिनेत्यासोबत ‘या’ चित्रपटात करणार रोमान्स!

Published on -

बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाने संपूर्ण देशाला भुरळ घालणारी सारा अर्जुन आता रणवीर सिंहच्या नायिकेच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकताच ‘धुरंधर’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि त्याच वेळी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं साराने, हीच ती गोड मुलगी जी एकेकाळी छोट्या भूमिकांनी मोठा प्रभाव निर्माण करत होती. पण आता ती रूपेरी पडद्यावर एका नव्या रुपात दिसणार आहे.

सारा अर्जुन

सारा अर्जुनचं नाव आज घराघरात पोहोचलं आहे. पण तिचा प्रवास जितका लवकर सुरू झाला, तितकाच खडतर आणि मेहनतीचा होता. मुंबईत 2005 साली जन्मलेली सारा ही अभिनेता राज अर्जुनची मुलगी. ‘सिक्रेट सुपरस्टार’ मधील कडवट पण लक्षवेधी खलनायक फारुख मलिक यांचं पात्र आठवतंय? तेच राज अर्जुन, ज्यांच्या अभिनयाचा वारसा साराला मिळाला.

साराचा अभिनय प्रवास अवघ्या 1 वर्षाच्या वयात एका जाहिरातीतून सुरू झाला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. ती जाहिरातींचा लाडका चेहरा झाली, पण खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात घर केलं ‘देइव तिरुमगाल’ या तमिळ चित्रपटाने. केवळ 6 वर्षांची असताना तिने विक्रमसारख्या सुपरस्टारच्या मुलीची भूमिका साकारत एक भावनिक आणि हृदयस्पर्शी परफॉर्मन्स दिला, ज्याने तिला तमिळ चित्रसृष्टीत सुपरस्टार बनवलं.

बॉलीवूडमधील कारकीर्द

‘शैवम’ या 2014 मधील चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत झळकली आणि तिच्या अभिनयाची ठसठशीत छाप सोडली. पुढे या चित्रपटाचा तेलुगू रिमेकही झाला. इतकंच नाही तर तिने बॉलिवूडमध्येही दमदार हजेरी लावली ‘एक थी डायन’, ‘जय हो’, ‘जज्बा’ अशा चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या मनात ठसली. विशेषतः ‘जज्बा’मध्ये ऐश्वर्या रायच्या मुलीची भूमिका तिने इतक्या आत्मीयतेने साकारली की प्रेक्षक भारावून गेले.

साराचा आलेख केवळ चित्रपटांपुरता मर्यादित नव्हता. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या मणिरत्नमच्या ‘पोन्नियिन सेल्वन 1 आणि 2’ मध्ये तिने ऐश्वर्या रायच्या पात्राच्या बालपणीची भूमिका साकारत पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधले. या भूमिकांमुळे ती भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी बालकलाकार बनली. एका अहवालानुसार तिचं मानधन तब्बल 10 कोटी रुपये आहे, जे तिच्या मेहनतीला मिळालेली योग्य पावती मानली जाते.

आता दिसणार ‘धुरंधर’मध्ये

 

आता ‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंगसोबत प्रमुख भूमिकेत येणं म्हणजे साराच्या करिअरचा एक नवा टप्पा आहे. तिच्या प्रगल्भ अभिनयात आणि ग्लॅमरस रूपात प्रेक्षकांना नव्याने प्रेमात पडावं लागेल. मात्र, रणवीर आणि सारामधील वयात जवळपास 20 वर्षांचा फरक असल्याने, अनेकांनी या जोडीवर टीका केली आहे. 40 वर्षीय रणवीर आणि 20 वर्षीय सारा यांचा ऑनस्क्रीन रोमान्स काही जणांना खटकला असला, तरी या नव्या जोडीच्या केमिस्ट्रीकडे प्रेक्षकांची उत्सुक नजर लागलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!