यमाची दिशा म्हणजेच दक्षिणमुखी घर शुभ असतं की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगतं?, जाणून घ्या!

Published on -

घर बांधताना किंवा खरेदी करताना आपण अनेक गोष्टी विचारात घेतो. जागेची किंमत, परिसराची सुरक्षितता आणि दिशाही.विशेषतः जर घर दक्षिणमुखी असेल, तर अनेकांच्या मनात लगेचच एक प्रश्न उभा राहतो हे घर शुभ आहे की अशुभ? दक्षिण दिशा यमाच्या म्हणजे मृत्यूच्या देवतेची दिशा मानली गेल्यामुळे या दिशेविषयी भीती वाटणं साहजिक आहे. पण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर ही एकतर्फी समजूत नक्कीच नाही.

दक्षिणमुखी घर

वास्तुशास्त्र हे घराचं फक्त बांधकाम नव्हे, तर त्यात राहणाऱ्या लोकांच्या मानसिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीचंही शास्त्र आहे. दक्षिण दिशा ही स्थैर्य, शक्ती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानली जाते. जर एखाद्याच्या घराचा प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल आणि तो वास्तुनुसार योग्य ठिकाणी बांधला असेल, तर अशा घरात समृद्धी टिकून राहते. विशेषतः जे लोक व्यवसायात, नेतृत्वाच्या भूमिकेत किंवा सार्वजनिक जीवनात आहेत, त्यांच्यासाठी दक्षिणमुखी घर अत्यंत फायदेशीर ठरू शकतं.

अर्थातच, योग्य उपाय आणि बांधणी नसेल, तर या दिशेचे नकारात्मक परिणामही दिसू शकतात. त्यामुळे जर तुमचं घर दक्षिणमुखी असेल, तर काही गोष्टी विशेष लक्षात घेतल्या पाहिजेत. मुख्य दरवाजा दक्षिणेच्या मध्यभागी किंवा आग्नेय दिशेच्या जवळ असावा. दरवाजावर शुभचिन्हं जसं की स्वस्तिक किंवा गणेशमूर्ती लावल्यास सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते असं मानलं जातं. घराच्या दक्षिण आणि नैऋत्य भागात जड फर्निचर, भिंती किंवा कपाट असावं, तर उत्तरेचा भाग अधिक उघडा आणि मोकळा ठेवावा.

रंगसंगती

रंगसंगतीही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. दक्षिणमुखी घरात लाल, नारिंगी किंवा तपकिरी रंगाचा वापर करावा. तो पडद्यांमध्ये असो किंवा सजावटीत यामुळे घरात उबदारपणा, चैतन्य आणि स्थिरता निर्माण होते. स्वयंपाकघर आग्नेय कोपऱ्यात असणं हितावह मानलं जातं, कारण ती आग्नेय दिशा अग्नी तत्त्वाची आहे. बेडरूम नैऋत्य दिशेला असल्यास, घरातील प्रेम, विश्रांती आणि स्वास्थ्य यामध्ये संतुलन साधलं जातं.

म्हणूनच, फक्त दिशा पाहून निष्कर्ष काढू नका. दक्षिणमुखी घर असलं म्हणजे ते अशुभ आहे असं समजणं चुकीचं आहे. योग्य वास्तुशास्त्राचे नियम पाळून, घराची रचना आणि सजावट त्यानुसार केल्यास तेच घर तुमच्यासाठी प्रगती, आनंद आणि शांततेचं केंद्र बनू शकतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!