घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मग वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक; उंदीर घरातच काय आजू-बाजूलाही दिसणार नाहीत!

Published on -

घरात उंदीर घुसले की सगळीकडे प्रचंड नुकसान करतात. यामुळे आपल्या घरातली स्वच्छता आणि आरोग्यही धोक्यात येते आणि सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे ते एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात इतक्या चपळपणे फिरतात की त्यांना पकडणं तर दूरच, दिसणंही अवघड होतं. मग अशा वेळी बाजारातून आणलेल्या विषमिश्रित औषधांवर अवलंबून राहणं कितपत सुरक्षित आहे?

कधीकधी तुमच्या घरातील स्वयंपाकघरातच अशा काही गोष्टी असतात ज्या या त्रासदायक उंदरांपासून सुटका करून देऊ शकतात. या घरगुती उपायांची विशेषता म्हणजे यात कोणत्याही प्रकारचे विष नसते, ज्यामुळे ते उंदरांचा जीव घेत नाहीत. मात्र, उंदीर घरात राहत नाहीत असे एक वातावरण तयार करते.

दालचिनी

दालचिनी हा मसाला स्वयंपाकघरात हमखास सापडतो आणि त्याचा सुगंध अनेकांना आवडतो. पण उंदरांना मात्र ती अगदी असह्य वाटते. तिच्या वासामुळे ते त्या भागात टिकू शकत नाहीत. तुम्ही दालचिनीची पावडर घराच्या कोपऱ्यांत शिंपडली, किंवा दालचिनी तेल थोडं पाण्यात मिसळून त्याची फवारणी केली, तर काही दिवसांतच उंदरांचा मागमूसही दिसणार नाही.

काळी मिरी

तसंच काळी मिरी, जी आपल्या आहारात चव वाढवण्यासाठी वापरली जाते, तिचाही वापर उंदरांना घालवण्यासाठी करता येतो. तिचा उग्र वास उंदरांना सहन होत नाही. थोडी काळी मिरी पाण्यात उकळून त्याची फवारणी केली, तर उंदीर त्या जागेपासून लांब राहतात.

तमालपत्र

तमालपत्र म्हणजे आपल्याला परिचित असलेला ‘तेजपत्ता’. स्वयंपाकात त्याचा उपयोग होत असला, तरी त्याचा वास उंदरांसाठी त्रासदायक असतो. दोन-तीन तमालपत्र घराच्या अशा जागांवर ठेवा जिथे उंदरांची ये-जा जास्त आहे, आणि तुम्ही पाहाल की ते तिथून उंदीर हळूहळू निघून गेले आहेत.

लाल मिरची

लाल मिरची ही तर जणू घरगुती कीटकनाशकच. ती केवळ उंदरांनाच नाही, तर इतर कीटकांनाही दूर ठेवते. चार चमचे लाल मिरची पावडर एका पाण्याच्या बाटलीत टाका, नीट हलवा आणि उंदरांची हालचाल जिथे जास्त असते तिथे स्प्रे करा. उंदरांना असं वाटेल की ही जागा राहण्यासाठी सुरक्षित नाही आणि ते दुसरीकडे निघून जातील.

या उपायांचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ते स्वस्त आहेत, कोणत्याही हानिकारक रसायनाशिवाय आहेत, आणि घरातले लहान मुलं किंवा पाळीव प्राणी यांच्या आरोग्यालाही धोका नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!