सिलेंडरमधील गॅस शिल्लक आहे की नाही?, ‘या’ सोप्या ट्रिकने सेकंदात समजेल किती गॅस उरलाय!

Published on -

आपण सगळेच अशा क्षणांना सामोरे गेलो आहोत, जेव्हा संध्याकाळी कामावरून थकून आलेली व्यक्ती स्वयंपाकाला बसते, आणि अगदी त्या क्षणीच गॅस संपतो. पोळ्या अर्धवट भाजून राहतात, घरच्यांचा चेहरा उतरतो आणि मग सुरु होते आधी पोट भरण्यापेक्षा गॅसवाल्याला कॉल करण्याची धावपळ. हे चित्र अनेक घरांमध्ये वारंवार घडतं. पण तुम्हाला माहिती आहे का, की याचं एक अतिशय सोपं आणि वैज्ञानिक उत्तर आहे?

होय, तुम्ही सिलेंडरमधील गॅस किती शिल्लक आहे हे अगदी सहजपणे, कोणतीही महागडी उपकरणं न वापरता, घरीच तपासू शकता. हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्वतःच म्हणाल “इतकं सोपं होतं का हे?”

ओला कापड

ही युक्ती वापरण्यासाठी प्रथम तुम्ही एक स्वच्छ कपडा पाण्यात भिजवून घ्या. नंतर हा कापड गॅस सिलेंडरवर पूर्णपणे गुंडाळा तळापासून ते झाकणाजवळपर्यंत. किमान 5 मिनिटांसाठी असेच ठेवून द्या. त्यानंतर कापड काढून सिलेंडरकडे बारकाईने पाहा, तुम्हाला लक्षात येईल की सिलेंडरचा काही भाग अजूनही ओला आहे तर काही भाग लवकरच सुकलेला दिसतो.

हे नेमकं का होतं? कारण एलपीजी सिलेंडरमधील गॅस द्रव स्वरूपात असतो आणि त्याचा थंडावा जिथपर्यंत गॅस आहे तिथे टिकून राहतो. त्यामुळे ओला कापड त्या भागावर लवकर सुकत नाही. पण गॅस नसलेल्या भागावर तापमान थोडं अधिक असल्यामुळे तिथे कापड लगेच सुकतं. हे निरीक्षण करून तुम्ही सहज समजू शकता की सिलेंडरमध्ये गॅस कुठवर उरलाय.

वजनावरून ओळखा गॅसची पातळी

जर तुमचं निरीक्षण कधीकधी चुकत असेल, तर एक अजून पारंपरिक पण विश्वासार्ह उपाय आहे, सिलेंडरचं वजन तपासा. गॅस भरलेला सिलेंडर हमखास थोडा जड वाटतो. पण जर तुम्हाला तो हलका वाटू लागला असेल, तर समजा गॅस जवळपास संपलाय. हा उपाय थोडा अंदाजावर आधारित असला तरी अनेक वर्षांपासून वापरला जातो आणि अनेकांना उपयुक्त ठरतो.

हे उपाय फक्त सोपे आणि खर्चविरहित नाहीत, तर 100% सुरक्षित देखील आहेत. कोणताही धोकादायक प्रयोग न करता, हे उपाय तुम्हाला घरबसल्या नेमकी माहिती देतात “सिलेंडरमध्ये गॅस किती उरलाय?”

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!