आजच्या डिजिटल युगात इंटरनेट हा आपल्या दैनंदिन गरजेचा एक अविभाज्य भाग झाला आहे. ऑफिसचे काम असो, ऑनलाइन शिक्षण, सोशल मीडिया किंवा एखाद्या आवडत्या वेबसीरिजचा एखादा भाग सगळं काही इंटरनेटवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत डेटा संपला की थोडा संतापच येतो. पण ही चिंता आता जिओच्या स्वस्त डेटा अॅड-ऑन पॅकने संपणार आहे. कारण, जिओने ₹70 पेक्षाही कमी किमतीत असे अनेक प्लॅन्स आणले आहेत, जे खास डेटा संपल्यानंतर उपयोगात आणता येऊ शकतात.

जिओच्या या पॅकमध्ये विविध प्रकारच्या गरजा लक्षात घेऊन प्लॅन तयार करण्यात आले आहेत. काही प्लॅन जिओ फोनसाठी खास आहेत, तर काही स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरतात. या सर्व प्लॅन्सची खासियत म्हणजे कमी किंमतीत भरपूर डेटा आणि विविध वैधता पर्याय. त्यामुळे, वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार प्लॅन निवडण्याची मुभा मिळते.
₹69 चा प्लॅन
सुरुवात करूया जिओच्या ₹69 च्या डेटा पॅकपासून. या पॅकमध्ये वापरकर्त्याला 7 दिवसांच्या वैधतेसह एकूण 6GB डेटा मिळतो. हे त्यांच्यासाठी आदर्श आहे, जे सातत्याने डेटा वापरत असले तरी थोडक्याच दिवसांसाठी अॅड-ऑन पॅक पाहत आहेत. याशिवाय, ₹62 चा एक प्लॅन जिओ फोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. यामध्येही 28 दिवसांच्या वैधतेसह 6GB डेटा मिळतो, जो नियमित वापरासाठी पुरेसा आहे.
₹49 आणि ₹19 चे पॅक
मात्र, काही वापरकर्त्यांना केवळ एका दिवसासाठी तात्पुरता डेटा लागतो, त्यांच्यासाठी जिओचे ₹49 आणि ₹19 चे पॅक उपयुक्त ठरतात. ₹49 मध्ये जरी वैधता केवळ 1 दिवसाची असली तरी त्यात अमर्यादित डेटा वापरण्याची मुभा मिळते, तर ₹19 च्या प्लॅनमध्ये स्मार्टफोन वापरकर्त्यांना 1GB डेटा मिळतो, जो सामान्य वापरासाठी पुरेसा ठरतो.
₹29 चा एक प्लॅन
त्याचबरोबर, ₹29 चा एक प्लॅन देखील आहे, जो 2 दिवसांची वैधता आणि 2GB डेटा देतो. हा प्लॅन अल्प कालावधीसाठी प्रवासात किंवा तातडीच्या गरजेसाठी उत्तम आहे. ₹26 चा जिओ फोन युजर्ससाठीचा एक पॅकदेखील उपलब्ध असून तो 28 दिवसांसाठी 2GB डेटा देतो.