जर तुम्ही इंटरनेट वापरात मास्टर असाल, टीव्ही आणि ओटीटीवर तुमचा जीव अडकलेला असेल, तर जिओने तुमच्यासाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. अगदी तीन महिन्यांच्या प्लॅनसह आता तुम्हाला मिळतोय 7 दिवसांचा मोफत बोनस, 100 ते 200 जीबीपर्यंतचा अतिरिक्त डेटा आणि त्यासोबत टीव्ही आणि ओटीटीचा जबरदस्त अनुभव तोही कोणतंही वेगळं शुल्क न देता.

जिओ होम प्लॅन हे प्रीमियम दर्जाचे फायबर इंटरनेट प्लॅन असून ते फक्त स्पीडपुरते मर्यादित नाहीत. यामध्ये ग्राहकांना भरपूर डेटा, टीव्ही चॅनेल्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटीटी अॅप्सचा फ्री अॅक्सेस मिळतो. म्हणजेच, एकाच सबस्क्रिप्शनमध्ये घरातल्यांना हाय स्पीड इंटरनेट, मोठा एंटरटेनमेंट पॅक आणि मोबाइलवर ओटीटीचा मस्त अनुभव सगळं मिळणार आहे.
2222 रुपयांचा प्लॅन
उदाहरणच द्यायचं झालं, तर जिओचा 2222 रुपयांचा प्लॅन घ्या. यात तुम्हाला 30 एमबीपीएस स्पीडसह 1000 जीबी डेटा आणि 7 दिवसांची फ्री एक्स्टेंडेड वैधता मिळते. शिवाय, 800 पेक्षा अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि 11 ओटीटी अॅप्सजसे की SonyLIV, Zee5, JioCinema इ. यांचा फुल ऑन अॅक्सेस मिळतो.
3333 रुपयांचा प्लॅन
याच ऑफरचा थोडा अधिक अपग्रेडेड प्रकार म्हणजे 3333 रुपयांचा प्लॅन. यात स्पीड वाढून 100 एमबीपीएस मिळतो आणि150 जीबी अतिरिक्त डेटा फ्री दिला जातो. यामध्ये देखील 800+ टीव्ही चॅनेल्स आणि 11 ओटीटी अॅप्सचा समावेश असतो. महत्त्वाचं म्हणजे, या प्लॅनमध्ये कॉलिंग सुविधा देखील उपलब्ध आहे, म्हणजे तुमचं कनेक्टिव्हिटीचं कामही सोपं होतं.
पण जर तुमचं इंटरनेट आणि एंटरटेनमेंटचं प्रेम अजून गहिरं असेल, तर जिओचा 4444 रुपयांचा प्लॅन एकदम फिट आहे. यात तुम्हाला तब्बल 200 जीबी अतिरिक्त डेटा फ्री मिळतो. तीन महिन्यांची वैधता आणि 7 दिवसांची बोनस एक्स्टेंशनसह यात मिळते 15 ओटीटी अॅप्सचा फुल सबस्क्रिप्शन, ज्यामध्ये Netflix आणि Amazon Prime Lite यांचा समावेश आहे. शिवाय, टीव्हीवर 800 पेक्षा जास्त चॅनेल्सचा मस्त अनुभव घ्यायचा आनंद वेगळाच मिळेल.