‘पंचायत’ या ग्रामीण भारतातील जीवनाचे प्रामाणिक चित्रण करणाऱ्या लोकप्रिय वेब सिरीजने प्रेक्षकांच्या मनात कायमच विशेष स्थान मिळवलं आहे. पण यंदाच्या सीझनमध्ये एका नवख्या पात्राने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे, विकासची पत्नी ‘खुशबू’. मालिकेत ती साधेपणाने बुरखा परिधान करून गावच्या सूनबाईच्या भूमिकेत दिसते. मात्र मालिकेबाहेरील तिचं खऱ्या आयुष्यातील रूप पाहून चाहते थक्क झाले आहेत.

अभिनेत्री तृप्ती साहू
खुशबू ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे तृप्ती साहू. तिचं खऱ्या आयुष्यातील व्यक्तिमत्व मालिकेतील लूकहून पूर्णपणे वेगळं आहे. ती एक मॉडेल आणि अभिनेत्री असून, तिचा ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावर सध्या जोरात चर्चेत आहे. तिचे फोटो पाहून अनेकांना विश्वासच बसत नाही की ही तीच साधी ‘खुशबू’ आहे जी ‘पंचायत’मध्ये दिसते. तिच्या स्टायलिश पोशाखांतून आणि आत्मविश्वासाने भरलेल्या पोस्ट्समधून तिचं मॉडेलिंग करिअर अगदी स्पष्ट दिसतं.
‘पंचायत’चा चौथा सिजन नुकताच प्रेक्षकांसमोर आला आणि चाहत्यांनी नेहमीप्रमाणे भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी खास चर्चेत राहिला तो ‘विधायक जी’चा डान्स आणि ‘खुशबू’चे अप्रतिम सादरीकरण. विकासच्या पत्नीच्या भूमिकेत तृप्तीने जितकं लोभस काम केलं, तितकंच तिच्या ग्लॅमरस प्रतिमेनेही चाहत्यांना आकर्षित केलं. तिचं नाव सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.
तृप्ती साहूचे करिअर
तृप्ती फक्त ‘पंचायत’पुरती मर्यादित नाही. तिने अभिनयाचा प्रवास 2022 मध्ये ‘पंखुडियां उडी-उडी’ या शोमधून सुरू केला. त्यानंतर ती बॉलिवूड आणि दक्षिणेकडील चित्रपटांमध्येही झळकली. चंदन रॉय अर्थात विकाससोबत तिने ‘गुलमोहर’ या चित्रपटात काम केलं आहे. तिचं काम हळूहळू प्रेक्षकांच्या आणि दिग्दर्शकांच्या नजरेत भरतंय, त्यामुळे तिच्या पुढील प्रवासाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर तृप्ती खूप सक्रिय आहे. तिचे प्रवास, फोटोशूट्स आणि वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवरून तिची आधुनिक जीवनशैली झळकते. तिच्या आत्मविश्वासात आणि लूकमध्ये एक खास आकर्षण आहे, ज्यामुळे तिचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत.