श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांवर असते महादेवाची कृपा, आपल्या गोंडस राजकुमार-राजकुमारीला द्या ‘ही’ शुभ नावे!

Published on -

श्रावण महिना हा भोलेनाथ यांना समर्पित मानला जातो. या काळात भाविक मोठ्या भक्तीभावाने शिवमंदिरात पूजा-अर्चा करतात. त्यातच या महिन्यात जन्म घेणाऱ्या बाळांना केवळ निसर्गाचा आशीर्वादच नव्हे, तर दैवी शक्तीचाही वरदहस्त लाभतो, अशी अनेकांची श्रद्धा असते. विशेषतः ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रात विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ही एक खास संधी असते, त्यांच्या नवजात बाळासाठी शुभ, अर्थपूर्ण आणि प्रभावी नाव ठेवण्याची.

अंकशास्त्रात प्रत्येक तारखेचा एक विशिष्ट अर्थ आणि ऊर्जा असते. त्यामुळे श्रावण महिन्यात बाळाचा जन्म कोणत्या दिवशी झाला आहे, याला खूप महत्त्व दिलं जातं. या महिन्याच्या प्रत्येक दिवसाला विशेष धार्मिक मूल्य आहे, पण अंकशास्त्रानुसार काही विशिष्ट तारखा अधिक शुभ मानल्या जातात. जर बाळाचा जन्म 1, 3, 6, 9, 10, 12, 15, 18, 19, 21, 24, 27 किंवा 28 तारखेला झाला असेल, तर त्याच्या आयुष्यात यश, तेज आणि अध्यात्मिक बल लाभण्याची शक्यता अधिक मानली जाते.

मुलांसाठी नावे

अशा बाळांसाठी निवडलेली नावेही त्याच्या जन्मतारखेप्रमाणे त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत असावीत, असे अंकशास्त्र सांगते. उदाहरणार्थ, श्रवण, नीलकंठ, हरी, कमल, वरुण, तरुण, अनंत, निरंजन, संदीप, प्रभाकर, अकुल, शांभव आणि सोम ही नावे मुलांसाठी अत्यंत शुभ मानली जातात. यामध्ये काही नावे थेट भगवान शिवाशी संबंधित असून ती बाळाच्या जीवनात सात्त्विकता आणि मानसिक स्थैर्य निर्माण करतात.

मुलींची नावे

मुलींसाठी देखील अशा प्रभावी आणि अर्थपूर्ण नावांची शिफारस केली जाते. पार्वती, शिवानी, शैलजा, नंदिनी, मेघना, खुशी, अनुपमा आणि सात्विका ही नावे केवळ गोड उच्चाराची नसतात, तर ती आपल्या संस्कृतीची, देवत्वाची आणि सौंदर्याची जाणीवही देतात. ही नावे मुलींच्या स्वभावात सौम्यता, करुणा आणि तेज भरतात, असे अनेक पालक अनुभवाने सांगतात.

श्रावणात जन्मलेली ही मुले खूप बुद्धिमान, जिज्ञासू आणि कठीण प्रसंगांमध्येही स्थिर राहणारी असतात, असेही मानले जाते. त्यांच्यात एक नैसर्गिक दैवी ओढ असते, जी त्यांना जीवनात योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देते. अनेक वेळा अशा मुलांचे आयुष्य आध्यात्मिक किंवा सेवा-प्रधान मार्गावर जाते, ज्यामुळे त्यांचे जीवन केवळ स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठीही प्रेरणादायी ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!