जिम न लावता, उपाशी न राहता वजन घटवा; रोज सकाळी नाश्त्यात खा ‘हे’ 5 चविष्ट पण हेल्दी पदार्थ!

Published on -

वजन कमी करणं ही गोष्ट फक्त डायटिंग, उपाशी राहणं आणि तासन्‌तास जिममध्ये घाम गाळणं एवढीच नाही. अनेकांना वाटतं की सडपातळ होण्यासाठी आपल्याला रोज भुकेल्या पोटाने जगावं लागेल. पण खरं सांगायचं झालं, तर तुमचं पोट भरलेलं असूनसुद्धा तुम्ही वजन कमी करू शकता. फक्त तुम्ही काय खात आहात, हे महत्त्वाचं!

आज आपण अशा 5 नाश्त्याच्या पदार्थांबद्दल बोलणार आहोत जे स्वादिष्टही आहेत, पोटभरही खाता येतात आणि वजन कमी करण्यात मदतही करतात. म्हणजेच, तुम्ही तुमचा आवडता नाश्ता खाऊनही हेल्दी राहू शकता आणि वजन घटवू शकता.

बेसन आणि मूग डाळीचा चिल्ला

सकाळी नाश्त्याला जर बेसन आणि मूग डाळीचा चिल्ला खाल्ला, तर ते एकदम परिपूर्ण आहार ठरतं. दोघेही प्रथिनांनी भरलेले असल्यामुळे तुमचं पोट बराच वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे मध्येच पुन्हा काहीतरी खायची गरज भासत नाही. शिवाय ते चवीलाही झकास असतं. थोडी मिरची, कांदा, आणि झणझणीत चव, तुम्हाला तुमच्या डाएटची आठवणही येणार नाही.

पनीर

दुसरा चांगला पर्याय म्हणजे पनीर म्हणजेच कॉटेज चीज. हे खाल्लं की फक्त स्नायूंना फायदा होतो असं नाही, तर वजन कमी करण्यासाठीही हे एक उत्तम साधन आहे. तुम्ही ते भाजून, भाजीमध्ये, सँडविचमध्ये किंवा भुर्जीच्या स्वरूपात घेऊ शकता. प्रथिनं, कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स यामुळे तुमचा आहार संतुलित होतो आणि अनावश्यक भूक लागत नाही.

अंडी

आता अंड्याचं नाव नसेल तर हेल्दी नाश्ता पूर्णच वाटत नाही. अंडी ही सहजपणे मिळणारी प्रथिनांची शिदोरी आहे. उकडलेलं अंडं, ऑम्लेट, किंवा भुर्जी तुम्ही कुठलाही प्रकार निवडा, पण ते नाश्त्याचा भाग असायलाच हवं. अंड्यामुळे पोट भरलेलं राहतं, आणि तुमचं खाणं आपसूकच नियंत्रित राहतं.

ओट्स किंवा ओटमील

ओट्स किंवा ओटमील हा अजून एक सुलभ आणि फायदेशीर पर्याय आहे. वजन कमी करायचं असेल आणि पोटाला आराम हवा असेल तर ओट्स सर्वोत्तम. त्यात फायबर, प्रथिनं, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम असे कितीतरी पोषणतत्त्व असतात. तुम्ही त्यात फळं, थोडं दूध, किंवा ड्रायफ्रुट्स घालून स्वादही वाढवू शकता.

शेवटी, आपल्या सर्वांची आवडती इडली-सांबार ही एक अशी गोष्ट आहे जी एकाच वेळी चवदार, हलकी आणि पोषणमूल्यांनी भरलेली आहे. त्यात फायबर, कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं आणि खनिजे असतात, जे पचनसंस्थेलाही मदत करतात. त्यामुळे पोट भरतं, शरीर ताजंतवानं राहतं, आणि तुमचं वजनही हळूहळू नियंत्रणात येतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!