फक्त 4 महिन्यांत 32 किलो वजन घटवलं, जाणून घ्या अभिनेत्री भूमी पेडणेकरचं चमत्कारीक डाएट रुटीन!

Published on -

बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटात एक जाड व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुकही केले होते. मात्र, यानंतर अभिनेत्रीने केवळ 4 महिन्यात तब्बल 32 किलो वजन घटवले होते. आजही भूमी एकदम फिट अँड फाईन दिसते, त्यामागे आहे तिची जबरदस्त जिद्द आणि शिस्तीचा आहार. केवळ चार महिन्यांत 32 किलो वजन घटवणं हे कुठलंच सहज काम नव्हतं, पण भूमीने ते शक्य करून दाखवलं.

भूमीने कोणतेही अत्यंत कठोर डाएट किंवा फॅन्सी फूड्सच्या मागे धावण्याऐवजी घरगुती अन्नावर विश्वास ठेवला. तिनं आपल्या आहारात फक्त पोषणमूल्यांनी भरलेलं अन्न घेतलं, ज्यात मुख्यतः फायबरयुक्त घरचं जेवण होतं. हे अन्न पचायला हलकं, पण शरीरासाठी खूप उपयुक्त होतं. त्यामुळं तिचं मेटाबॉलिझम चांगलं राहिलं आणि चरबी सहजपणे कमी व्हायला सुरुवात झाली.

साखर पूर्णतः बंद केली

तिनं अजून एक मोठा निर्णय घेतला, साखरेला पूर्णपणे रामराम केला. साखर ही एक अशी सवय आहे जी शरीरात हळूहळू चरबी जमा करते. पण भूमीने ती सवय बदलली. केवळ साखरच नाही, तर तिने प्रोसेस्ड फूड्स आणि रिफाइन्ड अन्न पदार्थही पूर्णपणे टाळले. त्यामुळे शरीरात जास्त कॅलोरीज जमा होण्याचं प्रमाण घटलं आणि वजन कमी होण्याचा वेग वाढला.

डिटॉक्सिफिकेशन

डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच शरीर शुद्धीकरण हाही तिच्या आहाराचा महत्त्वाचा भाग होता. ती वेळोवेळी उपवास करत असे, परंतु हा उपवास फक्त अन्न न खाण्यापुरता मर्यादित नव्हता. ती काकडी, पुदिना, लिंबूसारख्या थंडावा देणाऱ्या गोष्टी पाण्यात मिसळून प्यायची, जेणेकरून शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील आणि शरीराला आराम मिळेल.

व्यायाम

व्यायामाशिवाय वजन घटवण्याची प्रक्रिया अपुरीच ठरते. हे भूमीलाही ठाऊक होतं. त्यामुळे तिने चालणं, हलकी फुलकी हालचाल, योगा आणि कार्डिओ प्रकारांची मदत घेतली. या सगळ्याचा तिच्या शरीरावर खूप सकारात्मक परिणाम झाला. तिनं हे सगळं करताना कोणत्याही गोष्टीत अतिरेक केला नाही, पण नियमितपणा मात्र कायम ठेवला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!