पॅन कार्डवरील नावाची स्पेलिंग चुकलीये? घरबसल्या मोबाईलवर फक्त 5 स्टेप्स फॉलो करून करता येईल अर्ज! 15 दिवसांत घरी येईल नवीन पॅनकार्ड

Published on -

पॅन कार्ड हे आजच्या काळात प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत आवश्यक दस्तऐवज आहे. बँकेत खाते उघडायचे असो, गुंतवणूक करायची असो किंवा इन्कम टॅक्स भरायचा असो पॅन कार्डाशिवाय हे शक्यच नाही. त्यामुळे जर या कार्डावर तुमचं नाव चुकीचं छापलं असेल, तर ती एक छोटीशी चूकही मोठा अडथळा ठरू शकते. पण काळजी करू नका. या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला कुठेही रांगेत उभं राहावं लागणार नाही. फक्त इंटरनेट आणि तुमचा मोबाईल किंवा संगणक असला की तुम्ही घरी बसूनच नाव अपडेट करू शकता.

 

जर पॅन कार्डावर तुमचं नाव चुकीचं टाइप झालं असेल उदाहरणार्थ अक्षरांची चूक, संपूर्ण नावाऐवजी अर्धवट नाव, किंवा वडिलांचं नाव चुकीचं छापलेलं असेल तर ते दुरुस्त करणं सहज शक्य आहे. यासाठी सरकारने दोन अधिकृत पोर्टल्स उपलब्ध करून दिले आहेतTIN-NSDL (आता Protean eGov) आणि UTIITSL. तुम्ही या दोन्हीपैकी कुठल्याही वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.

 

असा’ करा अर्ज

अर्ज करताना काही गोष्टींची नोंद ठेवणं गरजेचं आहे. सर्वात आधी, तुमचं पॅन आणि आधार एकमेकांशी लिंक असणं अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे, आधारसोबत जोडलेला मोबाईल नंबर सक्रिय असावा, कारण त्यावरच OTP येतो. जर पॅन आणि आधारवरील नावे वेगळी असतील, तर आधी आधारवरील नाव दुरुस्त करणे आवश्यक ठरते.

नाव बदलण्यासाठीची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तुम्ही संबंधित वेबसाइटवर जाऊन “पॅन अपडेट/दुरुस्ती” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर अर्ज फॉर्म भरा आणि योग्य ती कागदपत्रे जसे की आधार कार्ड आणि जुन्या पॅनची प्रत अपलोड करा. फी भरताना ऑनलाइन पेमेंटचा पर्याय निवडा. एकदा हे सर्व झाले की, तुमच्या स्क्रीनवर पावती क्रमांक दिसेल, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता.

शुल्क

या प्रक्रियेसाठी साधारण ₹100 ते ₹110 शुल्क लागते. जर तुम्ही परदेशात राहत असाल, तर काही अतिरिक्त शुल्क लागू शकते. अर्ज पूर्णपणे बरोबर भरलेला असेल आणि आवश्यक कागदपत्रे दिलेली असतील, तर 15 ते 20 दिवसांत तुमच्या पत्त्यावर नवीन पॅन कार्ड पाठवले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!