समुद्रातले राक्षस! ‘हे’ आहेत पृथ्वीवरील 5 सर्वात भयानक जलचर प्राणी, एकाच चाव्यात महाकाय जहाजही फोडतात

Published on -

समुद्राचं विशाल आणि अनोळखी जग हे केवळ सौंदर्यानं भरलेलं नसतं, तर तितकंच भयावह आणि थरारकही असतं. जमिनीवर जसं आपलं जग आहे, तसंच खोल समुद्राच्या गर्भातही एक वेगळं, अज्ञात आणि प्रचंड जीवसृष्टीचं साम्राज्य आहे. इथं काही जीव असे आहेत जे फक्त त्यांच्या सौंदर्यासाठी नाही तर त्यांच्या भयंकर ताकदीसाठीही ओळखले जातात. हे जीव इतके धोकादायक असतात की त्यांच्या समोर माणूस तर सोडाच, हत्तीही फारसा टिकू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही प्राण्यांबद्दल, जे समुद्राच्या गूढ खोलीत सामर्थ्याने राज्य करतात.

ग्रेट व्हाईट शार्क

या साम्राज्याचा पहिला राजा म्हणजे ग्रेट व्हाईट शार्क. या माशाचा दरारा इतका आहे की तो समुद्रातील सर्वात भीतीदायक शिकारी म्हणून ओळखला जातो. जवळपास 20 फूट लांब असलेला हा मासा आपल्या तीव्र इंद्रिय आणि वेगवान हालचालींसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे दात इतके धारदार असतात की एकदाच चावलं की कोणताही प्राणी बचावू शकत नाही.

ओर्का (किलर व्हेल )

यानंतर आपल्याला भेटतो ओर्का, ज्याला आपण किलर व्हेल म्हणून ओळखतो. हा मासा एकट्यानं शिकार करत नाही, तर गटानं शिकार करणं ही त्याची खासियत आहे. जवळपास 30 फूटांपर्यंत वाढणारा हा महासागरातील सील, इतर माशांपासून ते शार्कपर्यंत कोणालाही गाठून टिपतो. त्याचं नियोजनबद्ध आणि संघटित शिकारपद्धती पाहून थरकाप उडतो.

समुद्री मगर

समुद्री मगर हा अजून एक प्राणी आहे जो कुणाच्याही अंगावर काटा आणू शकतो. जगातील सर्वात मोठ्या मगरांमध्ये गणला जाणारा हा प्राणी 23 फूटांपर्यंत लांब होऊ शकतो. त्याचे जबडेदेखील इतके बलवान असतात की मोठ्या प्राण्यांनाही ते सहज चिरडू शकतात.

लेविथन

त्यानंतर आपल्याला भेटतो लेविथन, एक असा महाकाय प्राणी जो आता अस्तित्वात नाही, परंतु ज्याच्या कथांनी आजही समुद्राविषयीची भीती कायम ठेवली आहे. 40 फूटांपर्यंत वाढणाऱ्या या प्राण्याविषयी असं मानलं जातं की तो एकेकाळी मोठमोठी जहाजंसुद्धा आपल्या तोंडात घेत असे. जरी तो आता अस्तित्वात नसेल, तरीही त्याचं भय समुद्रात अद्याप जिवंत आहे.

टायगर शार्क

आणि अखेरीस येतो टायगर शार्क, जो सागरात’समुद्राचा वाघ’ म्हणून ओळखला जातो. 16 फूट लांबीचा हा मासा आपल्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. तो फक्त मासे, कासव किंवा इतर सजीवच नव्हे तर समुद्रातील कचरा सुद्धा खातो. त्याचे तीव्र दात कोणतीही गोष्ट फाडून टाकण्यासाठी पुरेसे असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!