6720mAh बॅटरी आणि MIL-STD प्रोटेक्शनसह Moto G86 भारतात घालणार धुमाकूळ! पाहा लाँचिंग डेट आणि किंमत

Published on -

मोटोरोलाचा नवीन स्मार्टफोन Moto G86 Power 5G भारतीय बाजारात 30 जुलैला लाँच होतोय आणि त्याने स्मार्टफोन चाहत्यांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण केली आहे. पाण्यात बुडाला तरी खराब होणार नाही, तगडी बॅटरी आणि दमदार कॅमेरासह येणारा हा फोन खरोखरच “पॉवरफुल” ठरणार आहे. जर तुम्ही असा स्मार्टफोन शोधत असाल जो मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारा असेल, तर G86 Power तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो.

Motorola G86 चे फीचर्स

Motorola G86 Power 5G ला IP68 आणि IP69 रेटिंग देण्यात आली आहे, म्हणजेच धूळ, पाणी आणि पाण्याच्या तीव्र प्रवाहालाही हा फोन सहज तोंड देतो. याचा MIL-STD 810H सर्टिफाइड बिल्ड क्वालिटी, Corning Gorilla Glass 7i प्रोटेक्शन यामुळे तो ड्रॉप किंवा स्क्रॅचपासूनही सुरक्षित राहतो.

या फोनमध्ये 6.7 इंचाचा P-OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1.5K Super HD रिझोल्यूशनसह 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. हा डिस्प्ले व्हिज्युअल अनुभव उत्तम बनवतो.

कॅमेरा आणि बॅटरी

कॅमेराच्या बाबतीत, Moto G86 Power मध्ये 50MP चा Sony LYTIA 600 सेन्सर देण्यात आला आहे, जो OIS (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) सह येतो. याशिवाय, 8MP चा अल्ट्रावाइड आणि मॅक्रो लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सर्व कॅमेरे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी सक्षम आहेत आणि AI बेस्ड अनेक स्मार्ट मोड्स यात मिळतील.

या फोनला 6720mAh क्षमतेची बॅटरी मिळते, जी 33W टर्बोपॉवर चार्जिंग सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की ती 3 दिवस टिकते आणि 36 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देते. त्यामुळे सतत चार्जर शोधायची गरज नाही.

परफॉर्मन्सबाबत, यात MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर असून 8GB LPDDR4X RAM आणि 128GB किंवा 256GB स्टोरेज पर्याय आहेत. RAM Boost 3.0 मुळे रॅम 24GB पर्यंत वाढवता येतो, तसेच मायक्रोSD द्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्याची सुविधा आहे.

कलर ऑप्शन्स

याशिवाय, या फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस व हाय-रेझ ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, फिंगरप्रिंट स्कॅनर, थ्री-फिंगर स्क्रीनशॉट, Family Space 3.0, Smart Connect अशा अनेक AI फीचर्सचा समावेश आहे.

Moto G86 Power 5G Flipkart आणि अधिकृत Motorola वेबसाइटवरून खरेदी करता येईल. तो तीन रंगांमध्ये येईल Cosmic Sky, Golden Cypress आणि Spellbound. जर तुम्हाला एक दमदार, वॉटरप्रूफ आणि फीचर-पॅक स्मार्टफोन हवा असेल, तर 30 जुलैची तारीख लक्षात ठेवा!

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!