कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीच्या नावातच त्यांच्या भविष्याची झलक पाहतो. नाव जसं गोड असतं, तसंच ते नशीबही गोड करतं, असं अनेकांचं मत असतं. ज्योतिषशास्त्रही हेच सांगतं, की एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरात त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे, यशाचे आणि भाग्याचे संकेत लपलेले असतात. काही विशिष्ट अक्षरे अशी असतात, जी केवळ नावाचा भाग नसून, आयुष्याला उंचीवर नेण्याचं माध्यम ठरतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, जन्मवेळेच्या ग्रहस्थितीनुसार नाव ठरवले जातं. पण जर कोणाचं नाव C, D, P, R किंवा S या इंग्रजी अक्षरांनी सुरू होत असेल, तर त्यांचा प्रवास थोडा वेगळाच असतो. यशाच्या दिशेने जाणारा, संघर्षांनी शिकणारा पण शेवटी मोठ्या यशाची शिडी चढणारा.

C अक्षर
C अक्षराने सुरू होणाऱ्या नावांचे लोक आयुष्यात सुरुवातीला अनेकदा अडथळ्यांना सामोरे जातात. पण त्यांच्या मेहनतीला पर्याय नसतो. एकदा यशाच्या मार्गावर पाय ठेवल्यावर ते मागे वळून पाहत नाहीत. त्यांचा आत्मविश्वास आणि चिकाटी हे त्यांचे खरे शस्त्र असते. म्हणूनच ते नेहमी स्वतःला सिद्ध करून दाखवतात.
D अक्षर
D अक्षराची व्यक्ती अत्यंत मेहनती, संयमी आणि कुटुंबवत्सल असते. यश त्यांच्यासाठी एक ध्येय नसून एक जबाबदारी असते. ते केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या माणसांसाठीही पुढे जातात. त्यांच्यावर लक्ष्मी आणि सरस्वतीचा आशीर्वाद असतो, म्हणून त्यांची प्रगतीही संतुलित आणि स्थिर असते.
P अक्षर
P अक्षराचे लोक नशीबवान मानले जातात. त्यांच्या जीवनात खूप काही सहज मिळतं, पण ते त्याची किंमत ओळखतात. त्यांचं सौम्य पण प्रभावी व्यक्तिमत्त्व त्यांना समाजात एक विशिष्ट स्थान मिळवून देतं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांना एखादी अदृश्य शक्ती साथ देत असते, असं वाटतं.
R अक्षर
R अक्षराच्या लोकांमध्ये एक नैसर्गिक आकर्षण असतं. गर्दीतही ते उठून दिसतात कारण त्यांचा आत्मविश्वास आणि धाडसी वृत्ती त्यांना वेगळं ठरवते. त्यांना नशीबाची साथ असतेच, पण ते स्वतःहूनही कठोर परिश्रम करायला मागेपुढे पाहत नाहीत. म्हणूनच ते आपल्या आव्हानांवर मात करत यशाच्या शिखरावर पोहोचतात.
S अक्षर
S अक्षराने सुरू होणाऱ्या नावांच्या लोकांचे आयुष्य थोडं संघर्षमय असतं. पण हा संघर्ष त्यांच्यातील जिद्द वाढवतो. सुरुवातीच्या अडचणी त्यांना खच्ची करत नाहीत, उलट त्यातून ते अधिक प्रगल्भ आणि यशस्वी होतात. हे लोक स्वप्नवत जीवन जगण्यासाठी जी गरज असते ती कल्पनाशक्ती, तीव्र बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रम यांचा सुरेख समन्वय साधतात.