ऑफिसमधील वातावरण हे केवळ कामाच्या गतीवर नाही, तर तुमच्या आर्थिक प्रगतीवरही मोठा परिणाम करतं. अनेकांना वाटतं, की यश म्हणजे फक्त मेहनतीचं फळ. पण पूर्वेकडील संस्कृतींमध्ये, विशेषतः फेंगशुईमध्ये, ऊर्जा आणि दिशा यांचं संतुलनही तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे आज आपण अशा काही फेंगशुईच्या वस्तूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या ऑफिसमध्ये केवळ सौंदर्य वाढवत नाहीत, तर आर्थिक स्थैर्य आणि सकारात्मकता घेऊन येतात.
क्रिस्टल ग्लोब

सुरुवात करूया त्या प्रतीकेपासून जी बुद्धिमत्ता, योजना आणि विचारांची स्पष्टता दर्शवतात म्हणजेच क्रिस्टल ग्लोब. तुमच्या ऑफिसच्या ईशान्य कोपऱ्यात जर तुम्ही हा पारदर्शक क्रिस्टल ग्लोब ठेवला, तर तो तुमच्या निर्णयक्षमता आणि कल्पकतेला नवी दिशा देऊ शकतो. पण इतकंच नाही, त्याला वेळोवेळी फिरवत राहणं आणि स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. कारण फेंगशुईच्या दृष्टीने, स्थिर वस्तूंपेक्षा सतत प्रवाहात असणारी ऊर्जा अधिक फलदायी असते.
चिनी नाणी
पुढची गोष्ट म्हणजे चिनी नाणी. ही विशेष तांब्याची गोल नाणी, ज्यांच्या मध्यभागी चौकोनी छिद्र असतं, ती समृद्धीचं प्रतीक मानली जातात. तीन नाणी लाल रिबनमध्ये गुंडाळून जर तुम्ही ऑफिसच्या मुख्य दरवाज्याजवळ किंवा कॅश बॉक्समध्ये ठेवली, तर ती धनप्रवाह वाढवतात आणि अनावश्यक खर्चांवर लगाम घालतात. त्यांना साफसफाईसह आग्नेय कोपऱ्यात ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं.
लाफिंग बुद्धा
यशस्वी व्यवसायासाठी मन आनंदी असणं गरजेचं, आणि त्या आनंदाचं प्रतीक म्हणजे लाफिंग बुद्धा. त्याचं हसणं म्हणजे अडथळ्यांवर मात करण्याचं आणि मनातली चिंता दूर करण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे तो रिसेप्शनजवळ किंवा डेस्कवर ठेवणं फायदेशीर ठरतं. मात्र, हे लक्षात ठेवा की बुद्धाचा चेहरा नेहमी प्रवेशद्वाराकडे असायला हवा, आणि तो काहीसा उंचस्थळी ठेवल्यास त्याचा प्रभाव अधिक वाढतो.
मनी प्लांट
आर्थिक समृद्धीचा आणखी एक सोपा आणि निसर्गाशी जोडलेला मार्ग म्हणजे मनी प्लांट. ही हिरवी झाडं केवळ शोभेसाठी नसतात. फेंगशुईमध्ये ती संपत्ती आणि वाढती भरभराट दर्शवतात. जर तुम्ही ती आग्नेय दिशेला ठेवलीत आणि ती नेहमी हिरवीगार राहील याची काळजी घेतली, तर ती तुमचं ऑफिस सकारात्मकतेनं भरून टाकेल. पण लक्षात ठेवा, वाळलेली किंवा मरत चाललेली वनस्पती नकारात्मकता निर्माण करू शकते.
ड्रॅगन
फेंगशुईचा आणखी एक ताकदीचा प्रतीक म्हणजे ड्रॅगन. हे प्राचीन चिन्ह धैर्य, यश आणि नेतृत्व दर्शवतं. जर तुम्ही त्याला ऑफिसच्या पूर्व दिशेला ठेवलंत, तर तुमच्या व्यवसायाला नवी उंची गाठण्यासाठी एक अदृश्य बळ मिळू शकतं. त्याचं तोंड नेहमी कामाच्या दिशेकडे असावं आणि ते फार उंचही नसावं, याची विशेष काळजी घ्यायला हवी.
फेंगशुई कारंजे
आणि शेवटी, एक सौंदर्यदृष्ट्या सुंदर आणि ऊर्जेने परिपूर्ण गोष्ट म्हणजे फेंगशुई कारंजं. कारंज्याचं वाहणारं पाणी म्हणजे संपत्तीचा अखंड प्रवाह. उत्तर किंवा आग्नेय कोपऱ्यात ठेवल्यास ते आर्थिक स्थैर्य आणतं, पण त्यासाठी कारंज्यातील पाणी नेहमी स्वच्छ आणि वाहतं असणं गरजेचं आहे. थांबलेलं किंवा घाण पाणी नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतं. लहान डेस्कटॉप कारंजेसुद्धा यासाठी योग्य ठरतात.