मोफत नेटफ्लिक्स आणि जबरदस्त डेटा अशा ऑफर्ससाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चुरस वाढली आहे. विशेषतः जिओ आणि एअरटेल यांच्यात गेल्या काही काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. पण आता जिओने एक असा पोस्टपेड प्लॅन सादर केला आहे की, नेटफ्लिक्ससारख्या लोकप्रिय ओटीटी सेवेसह तो प्लॅन एअरटेलच्या तुलनेत तब्बल 650 रुपयांनी स्वस्त आहे. त्यामुळे अनेक जिओ ग्राहक खूपच खूश आहेत.

जिओचा 749 रुपयांचा प्लॅन
जिओने आपल्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये जे फायदे दिले आहेत, ते पाहता हे स्पष्ट होते की कमी पैशात अधिक सेवा देण्याच्या धोरणात जिओ अग्रेसर ठरतोय. 749 रुपयांमध्ये मिळणाऱ्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 100GB डेटा दिला जातो. याशिवाय, दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस मिळतात. पण खरी गंमत इथेच सुरू होते, कारण या प्लॅनमध्ये तीन अॅड-ऑन सिम जोडण्याची सोय आहे. प्रत्येक सिमसाठी 150 रुपये मोजावे लागतात, पण त्यासोबत प्रत्येक सिमवर 5GB अतिरिक्त डेटा देखील मिळतो. याचा अर्थ एकाच कुटुंबासाठी हा प्लॅन खूपच किफायतशीर ठरतो.
मिळणारे फायदे
पण यातली खरी आकर्षणाची गोष्ट म्हणजे नेटफ्लिक्सचं बेसिक सबस्क्रिप्शन, तेही पूर्णपणे मोफत. शिवाय, जिओ या प्लॅनच्या माध्यमातून दोन वर्षांसाठी Amazon Prime Lite चा अॅक्सेस देतो आणि त्यातच Disney+ Hotstar व JioTVसारखे ओटीटी प्लॅटफॉर्म्सही मोफत उपलब्ध आहेत. इतकंच नाही, तर जिओ AI क्लाउडवर 50GB मोफत स्टोरेजही वापरकर्त्यांना मिळतं, जे कामासाठी किंवा फोटो-व्हिडीओ सेव्ह करण्यासाठी फार उपयोगी ठरतं.
एअरटेलचा 1,399 रुपयांचा प्लॅन
या पार्श्वभूमीवर जर आपण एअरटेलचा सर्वात स्वस्त नेटफ्लिक्ससह पोस्टपेड प्लॅन पाहिला, तर त्याची किंमत थेट 1,399 रुपये आहे. यामध्ये ग्राहकाला 150GB डेटा दिला जातो, आणि तीन अॅड-ऑन सिम मोफत मिळतात, ज्यावर प्रत्येकी 30GB डेटा मिळतो. नेटफ्लिक्स बेसिकचं सबस्क्रिप्शन इथेही मिळतं, पण अमेझॉन प्राइम फक्त 6 महिन्यांसाठीच मोफत आहे आणि हॉटस्टारचा अॅक्सेस एक वर्षासाठी आहे.
एकंदरीत पाहता, जिओचा 749 रुपयांचा प्लॅन जास्त फायदेशीर वाटतो.किंमत कमी असूनही तो एकाचवेळी ओटीटी मनोरंजन, भरपूर डेटा, कुटुंबासाठी अॅड-ऑन सिम्स आणि क्लाउड स्टोरेजही देतो.