बापरे! ट्रेन आहे की राजवाडा? भारतातील ‘या’ ट्रेनचे तिकीट दर एका कारच्या किंमतीएवढे, पण प्रवास एकदम राजेशाही!

Published on -

भारतात एक अशी ट्रेन आहे, जिच्यात एका प्रवासासाठी तब्बल ₹4 लाखांहून अधिक खर्च येतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. ही काही सामान्य ट्रेन नाही, ही आहे भारतीय रेल्वेची महाराजा एक्सप्रेस. जगातील सर्वात आलिशान आणि महागड्या ट्रेनपैकी एक. ही ट्रेन केवळ प्रवासाचे साधन नाही, तर एका शाही जीवनशैलीचा थेट अनुभव आहे. येथे तुम्हाला मिळते 5 स्टार हॉटेलची सुविधा, राजवाड्यासारखी सजावट आणि तुमचा प्रत्येक क्षण खास बनवणारी वैयक्तिक सेवा आणि हे सगळं मिळतं एका तिकीटात.

महाराजा एक्सप्रेसमधील सुविधा-

IRCTC द्वारा चालवली जाणारी ही ट्रेन भारताच्या लक्झरी टुरिझमची शान आहे. एकूण 23 कोच असलेल्या या ट्रेनमध्ये 14 प्रवासी कोच, 2 डायनिंग कार्स, एक बार-लाउंज, लायब्ररी, आणि इतर अनेक लक्झरी सुविधा आहेत. फक्त 84 प्रवाशांचीच व्यवस्था असलेली ही ट्रेन खास व्यक्तींसाठीच असते.

या ट्रेनमध्ये तुम्हाला डिलक्स केबिन, ज्युनिअर सुईट्स, सुईट्स आणि एक प्रेसिडेंशियल सुईट मिळतो. प्रेसिडेंशियल सुईट म्हणजे संपूर्ण एक कोच ज्यामध्ये मास्टर बेडरूम, लिव्हिंग रूम, दोन बाथरूम्स आणि टबसह शॉवरची सुविधा आहे. सर्व केबिनमध्ये वातानुकूलन, टेलिव्हिजन, डीव्हीडी प्लेअर, वैयक्तिक तिजोरी आणि तापमान नियंत्रणही आहे.

राजेशाही जेवण आणि लाउंज सुविधा

जेवणासाठी “रंग महल” आणि “मयूर महल” नावाच्या डायनिंग कार्स आहेत, जिथे सोन्याच्या भांड्यांमध्ये अन्न दिलं जातं. ‘राजा क्लब’ बार आणि ‘सफारी लाउंज’मध्ये चविष्ट नाश्ता आणि पेये मिळतात. प्रत्येक गोष्ट शाही आणि वैभवशाली असते.

प्रवास मार्ग

ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान ही ट्रेन चार विशेष मार्गांवर धावते. भारताचा वारसा, द इंडियन पॅनोरामा, इंडियन स्प्लेंडर आणि ट्रेझर्स ऑफ इंडिया. हे मार्ग तुम्हाला मुंबई, दिल्ली, आग्रा, जयपूर, जोधपूर, खजुराहो, वाराणसी, लखनऊ यांसारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांमधून घेऊन जातात.

तिकीटाची किंमत

डिलक्स केबिनसाठी तिकीट ₹4.13 लाखांपासून सुरू होते आणि प्रेसिडेंशियल सुईटसाठी ₹20 लाखांपर्यंत जाते. विशेष म्हणजे, ‘इंडियन स्प्लेंडर’ मार्गावर फक्त 4 रात्री-5 दिवसांच्या प्रवासासाठीही ₹4 लाखांहून अधिक खर्च येतो.

या तिकीटामध्ये 24×7 बटलर सेवा, रेड-कार्पेट स्वागत, जंगल सफारी, स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, ऑनबोर्ड वायफाय, लाईव्ह टीव्ही, लायब्ररी आणि शॉपिंग कोच यांचा समावेश आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News