पावसाच्या सरींप्रमाणेच या जुलैमध्ये OnePlus चाहत्यांसाठी आनंदाचा वर्षाव होणार आहे. OnePlus ने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर जबरदस्त सवलती जाहीर करत एक धमाकेदार मान्सून सेल आणला आहे. 10 जुलैपासून सुरू होणाऱ्या या सेलमध्ये OnePlus 13, OnePlus 13s आणि OnePlus 13R हे तीनही स्मार्टफोन मोठ्या सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. एवढंच नव्हे तर यावेळी काही मॉडेलसोबत मोफत इअरबड्ससुद्धा देण्यात येणार आहेत, त्यामुळे खरेदीदारांसाठी हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल.
OnePlus 13s

OnePlus.in, OnePlus एक्सपिरीयन्स स्टोअर्स आणि अधिकृत रिटेल पार्टनर्स यांच्यामार्फत सुरू होणाऱ्या या सेलमध्ये OnePlus 13s हे स्मार्टफोन 49,999 रुपयांच्या प्रभावी किंमतीत मिळेल. यामध्ये 5,000 रुपयांची बँक सूट आणि 5,000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस आहे. जुनं डिव्हाइस देऊन नवीन फ्लॅगशिप घेण्याची ही एक उत्तम संधी आहे. त्यामुळे OnePlus 13s वर नजर ठेवणाऱ्यांनी आता उशीर न करता या संधीचा फायदा घ्यायलाच हवा.
OnePlus 13
दुसरीकडे, OnePlus 13 देखील 59,999 रुपयांपर्यंतच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येणार आहे. यात कार्ड सूट आणि बँक ऑफर मिळून एकूण 10,000 रुपयांपर्यंतचा लाभ आहे. ICICI सारख्या निवडक बँकांच्या कार्डधारकांना या ऑफरचा फायदा होणार असून 9 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI ची सोयही देण्यात आली आहे.
OnePlus 13R
पण खरी चमक OnePlus 13R मध्ये आहे. केवळ 39,999 रुपयांमध्ये हे मॉडेल मिळणार असून त्यासोबत कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता OnePlus Buds 3 मोफत दिले जातील. याशिवाय, कार्ड वापरकर्त्यांना 3,000 रुपयांची थेट सूट आणि 6 महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI मिळू शकतो. कमी बजेटमध्ये उत्तम फीचर्स आणि प्रीमियम अनुभव देणारा हा फोन अनेकांसाठी परवडणारा ठरेल.
या सर्व ऑफर्स केवळ OnePlus च्या मान्सून सेलपुरत्या मर्यादित नाहीत. 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या Amazon Prime Day सेलमध्येही हीच सूट मिळणार आहे. म्हणजेच, कोणतंही माध्यम निवडा, ऑफर्स तुमच्यासाठी तयार आहेत.