भारतीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणे ही नेहमीच मोठी गोष्ट मानली जाते. पण प्रत्येक प्रकारात म्हणजेच कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये शतक झळकावणे ही अजूनच दुर्मिळ कामगिरी आहे. क्रिकेटप्रेमींच्या मनात कायमच घर करून राहिलेल्या सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांची नावं या यादीत नसतील, यावर विश्वास ठेवणंही कठीण आहे. मात्र आकडेवारी नेहमी वास्तव सांगते, आणि तीच वास्तव सध्या काही नव्या पिढीच्या खेळाडूंना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहे.

शुभमन गिल
सध्या फक्त 5 भारतीय फलंदाज असे आहेत, ज्यांनी तिन्ही प्रमुख फॉरमॅट्समध्ये शतकी खेळी केली आहे. त्यामध्ये एक नाव लक्षणीय आहे, शुभमन गिल. बांगलादेशविरुद्ध कसोटीत त्याने आपली शतकी खेळी साकारली, झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शतक ठोकले आणि न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मध्ये दमदार शतक झळकावून त्याने या विशेष क्लबमध्ये प्रवेश मिळवला. एक युवा फलंदाज म्हणून त्याच्या कामगिरीने भारतीय संघाच्या भविष्यातील आशा उंचावल्या आहेत.
विराट कोहली
या यादीतील दुसरे नाव म्हणजे विराट कोहली. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज. त्याने 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत शतक ठोकले, तर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आणि अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मध्ये शतक झळकावले. विराटची ही सातत्यपूर्ण आणि वेगवेगळ्या प्रकारातील आक्रमकता त्याला खास बनवते.
केएल राहुल
केएल राहुलनेही या यादीत स्थान मिळवले आहे. त्याने कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध, एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध आणि टी-20 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शतक ठोकून तिन्ही फॉरमॅट्समध्ये आपली छाप पाडली आहे.
रोहित शर्मा
या खास गटात भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत आपलं पहिले शतक ठोकलं, त्याच वर्षी म्हणजे 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय सामन्यातही शतक केले, आणि टी-20 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त खेळी करत शतक झळकावले. रोहितच्या नावावर टी-20 मधील अनेक विक्रम आहेत, पण तिन्ही फॉरमॅट्समधील शतक त्याच्या अष्टपैलूतेची ओळख पटवतात.
सुरेश रैना
या सगळ्यांमध्ये एक नाव विशेष लक्षवेधी आहे, सुरेश रैना. तो भारतासाठी तिन्ही प्रकारात शतक करणारा पहिला फलंदाज आहे. 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटीत शतक करून त्याने सुरुवात केली, हाँगकाँगविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात दमदार खेळी करत इतिहास रचला. रैनाचा खेळ आणि त्यातील जोश नेहमीच भारतीय संघासाठी प्रेरणादायक राहिला आहे.