पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत हिंदू फॅशन आयकॉन, ज्याचे शबाना आझमी आणि जावेद अख्तरही आहेत क्लायंट! कोण आहे हा पाकिस्तानी डिझायनर?

Published on -

पाकिस्तानात हिंदू लोकसंख्या सुमारे 2.17 टक्के आहे आणि त्यामध्येही काही व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जागतिक पातळीवर नाव कमावले आहे. अशाच एका व्यक्तीचा उल्लेख करायचा झाला, तर दीपक पेरवानी यांचे नाव आघाडीवर घेतले जाते. ते पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदूंपैकी एक आहेत आणि त्यांच्या यशाची कहाणीही तितकीच प्रेरणादायी आहे.

दीपक पेरवानी

1974 मध्ये सिंध प्रांतातील मीरपूर खास येथे जन्मलेले दीपक पेरवानी हे व्यवसायाने फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी 1996 मध्ये स्वतःचे Deepak Perwani (DP) हे फॅशन लेबल सुरू केले. सुरुवातीला त्यांनी वधू आणि फॉर्मल पोशाखांवर लक्ष केंद्रित केले आणि नंतर त्यांच्या नावाचा ब्रँड संपूर्ण पाकिस्तानात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचला.

दीपकचे डिझाईन्स जगभरात प्रशंसिले गेले आहेत. त्यांनी पाकिस्तानच्या सीमेपलीकडेही आपली छाप सोडली असून, 2014 मध्ये बल्गेरियन फॅशन अवॉर्ड्समध्ये त्यांना जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वोत्तम डिझायनर म्हणून गौरवण्यात आले होते. याशिवाय त्यांनी लक्स स्टाईल अवॉर्ड, बीएफए अवॉर्ड आणि इंडस स्टाईल गुरू अवॉर्ड यांसारखे अनेक पुरस्कार पटकावले आहेत.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर

दीपक पेरवानी यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. त्यांनी जगातील सर्वात मोठा कुर्ता डिझाइन करून हा मान मिळवला होता. या ऐतिहासिक कुर्त्यामुळे त्यांचे नाव केवळ पाकिस्तानातच नव्हे तर संपूर्ण जगात गाजले.

भारतामध्येही दीपक पेरवानी यांचे बरेच चाहते आहेत. त्यांच्या ग्राहकांमध्ये भारतीय गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांचा समावेश आहे. फॅशन क्षेत्राबरोबरच दीपकने अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. त्यांनी मलेशिया आणि चीनमध्ये सांस्कृतिक राजदूत म्हणून पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. ते सध्या कर्ज-ए-जान या लोकप्रिय पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये बख्तियार ही भूमिका साकारत आहेत. या मालिकेत यमना झैदी, ओसामा खान आणि नामीर खान हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

एकूण संपत्ती किती?

माध्यमांच्या अंदाजानुसार, दीपक पेरवानी यांची एकूण संपत्ती 50 कोटी पाकिस्तानी रुपयांहून अधिक आहे, जी भारतीय रुपयांमध्ये सुमारे 15 कोटी ते 18 कोटी दरम्यान आहे. मात्र, ब्रँड व्हॅल्यू आणि जागतिक कनेक्शन लक्षात घेता, ही आकडेवारी अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!