हिमालयात आढळणाऱ्या ‘या’ वनस्पतीसाठी लोक कोट्यवधी खर्च करायलाही तयार, फायदे ऐकून थक्क व्हाल!

Published on -

हिमालयाच्या उंचच उंच पर्वतरांगांमध्ये अशी एक नैसर्गिक संपत्ती लपलेली आहे, जिला पाहण्यासाठी आणि मिळवण्यासाठी शेकडो लोक दरवर्षी प्राण पणाला लावतात. नाव तिचं, कीडजाडी. दिसायला साधी, पण तिचं औषधी मूल्य इतकं अफाट आहे की ती सोन्यापेक्षाही अधिक महाग विकली जाते. एवढंच नाही तर तिच्या शोधात अनेकदा परदेशी एजंट आणि चिनी सैनिकांचाही सहभाग असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यावरूनच याची किंमत आणि दुर्मिळता लक्षात येते.

‘कीडजाडी’ (कॉर्डिसेप्स )

ही वनस्पती म्हणजे केवळ झाडाचं एखादं देठ नव्हे, तर एक विलक्षण जैविक चमत्कार आहे. ‘कीडजाडी’ म्हणजेच कॉर्डिसेप्स, ही खरंतर एक प्रकारची बुरशी आहे, जी विशिष्ट प्रकारच्या अळ्यांच्या शरीरावर वाढते. ही बुरशी अळीच्या आत वाढू लागते, तिचं पोषण घेते, आणि शेवटी ती अळी मारते. त्यानंतर तिच्या शरीरातून एक छोटा देठ बाहेर येतो, जो बुरशीचा मुख्य भाग असतो. हा सगळा जीवशास्त्रीय खेळ हिमालयातील विशिष्ट उंचीवर, विशिष्ट हवामानातच घडतो. त्यामुळेच ही वनस्पती जगात फार थोड्या भागांमध्ये आणि खूपच मर्यादित प्रमाणात आढळते.

कीडजाडीचे फायदे

कीडजाडीला पारंपरिक औषधात अत्यंत महत्त्व दिलं जातं. आयुर्वेदात, तिबेटी औषधशास्त्रात आणि चिनी वैद्यकशास्त्रात याचा वापर अनेक गंभीर आजारांवर केला जातो. ही वनस्पती नपुंसकत्व दूर करण्यात, लैंगिक शक्ती वाढवण्यात, थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. शिवाय, ही शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, थंड हवामानात शरीराला गरम ठेवते आणि शारीरिक स्टॅमिना सुधारते, असंही मानलं जातं.

याच गुणधर्मांमुळे कीडजाडीची किंमत दर किलोसाठी लाखो रुपयांपर्यंत पोहोचते. काही वेळा तर ती सोन्याच्या किमतीलाही ओलांडते. पण एवढ्यावरच थांबत नाही. हिच्या मागणीमुळे अनेकदा हिमालयात तस्करी, बेकायदेशीर खणकाम आणि स्थानिक लोकांमध्ये वाद ही घडत असतात. भारताच्या सीमावर्ती भागात ही वनस्पती आढळत असल्याने अनेकदा संरक्षण दलांनाही सुरक्षा वाढवावी लागते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!