केतू ग्रहाच्या लाडक्या असतात ‘या’ जन्मतारखा, असे लोक लहान वयातच कमावतात पैसा आणि नाव!

Published on -

कधी कधी काही लोक आयुष्यात जणू ज्या गोष्टींना हात लावतात त्या आपोआपच त्यांच्या बाजूने वळतात, यश त्यांच्या मागे धावतं, आणि नशीब त्यांच्या पाठीशी उभं राहतं. अशा लोकांमध्ये एक विशेष गुणधर्म असतो त्यांचा मुलांक. अंकशास्त्राच्या दुनियेत, प्रत्येक जन्मतारीख एक विशिष्ट ऊर्जा घेऊन येते आणि हीच ऊर्जा त्या व्यक्तीच्या स्वभावावर, निर्णयांवर आणि नशिबावर प्रभाव टाकते. आज आपण अशाच एका विलक्षण अंकाबद्दल बोलतोय, तो म्हणजे मूलांक 7.

जर तुमचा जन्म महिन्याच्या 7,16 किंवा 25 तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 7 असतो. हा अंक साधासुधा नाही, याच्या मागे आहे केतू या छुप्या पण प्रभावशाली ग्रहाचा हात. केतूचे वैशिष्ट्य म्हणजे अंतर्मुखता, आध्यात्मिकता आणि गूढतेचा आकर्षण. म्हणूनच मूलांक 7 असलेली मंडळी विचारशील, शांत, पण एकदम ठाम असतात. एकदा काहीतरी ठरवलं की मग त्यातून मागे हटायचं नाही, ही त्यांची खासियत.

मूलांक 7 चा स्वभाव आणि गुण

हे लोक लहान वयापासूनच अभ्यासात हुशार असतात. त्यांना समजण्याची, विचार करण्याची शैली वेगळी असते. त्यांच्या विचारांमध्ये एक प्रकारची खोली असते, जी इतरांना सहजपणे जाणवत नाही. पण याचमुळे ते कोणत्याही क्षेत्रात गेले तरी यश त्यांना हमखास मिळतं. शिक्षण, कला, विज्ञान, खेळ, संगीत कुठेही ते स्वतःचा ठसा उमठवतात.

या मूलांकाचे लोक त्यांच्या कुटुंबासाठीही खूप भाग्यवान ठरतात. त्यांच्यामुळे घरामध्ये आर्थिक स्थैर्य, आदर आणि शांती निर्माण होते. त्यांचा शांतपणा, विचारपूर्वक बोलणं, आणि वेळप्रसंगी दाखवलेली निर्णयक्षमता हे त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतं.

मूलांक 7 असलेले प्रसिद्ध व्यक्ती

मूलांक 7 असलेले काही प्रसिद्ध चेहरे आपण ओळखतो, माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी, ज्यांनी आपली संयमित वृत्ती आणि शांत डोक्याने केलेली नेतृत्वशैलीने भारताला अनेकदा विजय मिळवून दिला. ब्रूस लीसारखा लढाऊ कलाकार, ज्याच्या नावाने आजही लोक प्रेरित होतात, तोही या अंकाचा प्रतिनिधी. सैफ अली खान, पंडित रविशंकर हेही या यादीतले मानकरी आहेत.

या लोकांच्या आयुष्यात एक गोष्ट हमखास असते, ते कधीही हार मानत नाहीत. संकटं आली तरी पळत नाहीत, उलट त्यांच्याशी लढतात. ते महत्त्वाकांक्षी असतात, आपल्या स्वप्नासाठी मेहनत करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!