जगात काही लोक असतात, ज्यांच्या आयुष्यात संपत्ती अगदी अचानक, एखाद्या वरदानासारखी अवतरते. त्यांचा प्रवास सामान्य असतो, पण यश त्यांच्या दारात वाऱ्याच्या वेगाने येतं. यामागे त्यांच्या जन्मतारखेचा एक गुप्त संकेत लपलेला असतो. अंकशास्त्रात असाच एक विलक्षण आणि प्रभावी अंक म्हणजे ‘4’. ज्यांचा जन्म 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे, त्यांना या खास संख्येचे आशीर्वाद लाभतात.

अंक 4
असं म्हणतात की या लोकांच्या आयुष्यात पैशांचा पाऊस अचानक पडतो. सुरुवातीला त्यांचं आयुष्य सामान्य असतं, संघर्षाचंही असतं, पण एकदा का त्यांना योग्य दिशा मिळाली, की ते थेट करोडपती नाही, तर अब्जाधीश देखील होऊ शकतात. त्यांच्या आत एक वेगळंच तेज असतं, वेगळा विचार करायचं, हटके वागायचं आणि सगळ्यांहून पुढे जायचं. 4 हा अंक राहू ग्रहाशी संबंधित असतो, जो गूढ, थोडा विचित्र पण फार ताकदवान मानला जातो. त्यामुळेच या लोकांच्या व्यक्तिमत्वात एक रहस्यमय आकर्षण असतं.
अंक 4 चे गुण आणि स्वभाव
त्यांची बुद्धिमत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि मेहनतीची तयारी त्यांना अपार यशाच्या उंचीवर घेऊन जाते. विशेषतः व्यवसाय, शेअर बाजार, नविन स्टार्टअप्स किंवा तंत्रज्ञानाच्या जगात ते चमकतात. त्यांच्या जोखमीच्या निर्णयांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास असतो, जो सामान्य माणसांमध्ये क्वचितच दिसतो. मात्र, हीच धाडसाची वृत्ती जर दिशाहीन झाली, तर नुकसानाचं कारणही बनू शकते.
या लोकांचं मन सतत नव्या कल्पनांनी भरलेलं असतं. त्यांना पारंपरिक मार्गांपेक्षा वेगळे रस्ते अधिक आवडतात. हे लोक फारसे लोकांच्या सल्ल्यावर चालणारे नसतात, पण स्वतःचा अनुभवच त्यांचा खरा गुरू असतो. त्यांची मेहनत खऱ्या अर्थाने जिद्दीनं भरलेली असते. कामात ते इतकं बुडतात की जग विसरून जातात, आणि तेव्हा त्यांच्या आयुष्यात मोठे आर्थिक बदल घडतात.
करिअर आणि धार्मिक स्वभाव
व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीतही ते थेट आणि स्पष्टवक्ते असतात. त्यांना दिखाव्याचं आकर्षण नसतं, पण आपली मते ठामपणे मांडतात. त्यामुळेच ते राजकारण, मिडिया, कायदा, किंवा नेतृत्वाच्या क्षेत्रात आपली छाप सोडतात. समाजात त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं. त्यांच्या बोलण्यात प्रभाव असतो, आणि त्यांच्या निर्णयांनी अनेक लोक प्रभावित होतात.
त्यांचा धार्मिक स्वभाव त्यांना आधार देतो. ते श्रद्धाळू असतात, पण अंधश्रद्धाळू नाहीत. एक प्रकारची शिस्त, एक अंतर्गत नीती त्यांना योग्य मार्गावर ठेवते. मात्र, यशाच्या शोधात कधी-कधी ते घाई करतात आणि चुकतात. म्हणूनच त्यांच्या यशाच्या प्रवासात संयम आणि योग्य दिशेने मार्गक्रमण गरजेचे असते.