अनेकदा आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचा विचार करत बसतो की, काही लोक सतत यशस्वी कसे होतात? का काहींना फारसे प्रयत्न न करता सगळं मिळतं? यामागे केवळ मेहनत नाही, तर त्यांच्या जन्मतारखेत लपलेला एक गूढ संकेतही असू शकतो. अंकशास्त्र म्हणजेच Numerology या प्राचीन विद्येच्या मते, काही विशिष्ट तारखांना जन्म घेणारे लोक विलक्षण नशिबाचे धनी असतात. त्यांचं संपूर्ण आयुष्य केवळ सुखदुःखात नव्हे, तर विलास आणि यशाच्या सावलीत घालवणारे ठरते.

मूलांक 4
जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 4 आहे. आणि हा मूलांक इतरांपेक्षा वेगळा, थोडा गूढ आणि फारसे समजून न येणारा असतो. या संख्येचे अधिपत्य राहू या ग्रहावर असते, ज्याला पुराणांमध्ये सत्तेचा गुप्त खेळ करणारा, युक्तीने गोष्टी साधणारा आणि अपार बुद्धिमत्तेचा ग्रह मानले जाते. त्यामुळेच मूलांक 4 असलेले लोक सहजगत्या कोणाच्या अधीन राहत नाहीत; ते स्वतःच्या मर्जीने जगतात.
हे लोक आयुष्यात विलासाचा माग घेतात, पण ते निव्वळ नशिबावर नाही, तर स्वतःच्या मेहनतीवर जगतात. त्यांना आराम आणि आलिशान जीवनशैली फार आवडते, मात्र त्यासाठी ते आयुष्यभर प्रामाणिक प्रयत्न करत राहतात. त्यांनी साध्य केलेल्या यशामागे त्यांच्या श्रमांची सावली असते. त्यांच्या नजरेत स्पष्टता असते आणि पद्धतशीरपणा त्यांना निसर्गदत्त मिळालेला असतो.
रहस्यमयी स्वभाव आणि गुण
मात्र याच व्यक्तींमध्ये एक वेगळा रंगही दडलेला असतो रहस्य आणि अंतर्मुखता. त्यांचं मन खोल असतं. त्यांना समजून घेणं इतरांसाठी कठीण जातं, पण हेच लोक दुसऱ्यांच्या मनाचा आरसा बनतात. कुणाचं दु:ख, कुणाचा खोटेपणा किंवा कुणाचं खऱ्या मनापासूनचं प्रेम, हे ते अचूक ओळखू शकतात. त्यांच्या संवेदनशीलतेमुळे ते फार सहानुभूतीशील असतात, पण त्याच वेळी जर कुणी त्यांचं स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न केला, तर ते रागाने पेटून उठतात. हा राग त्यांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम करतो आणि कधी कधी चुकीच्या वाटांवरही घेऊन जातो.
मूळांक 4 असलेल्यांना आर्थिक बाबतीत फारशी चिंता करण्याची गरज नसते. त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते, असे मानले जाते. आयुष्यात पैशाची चणचण क्वचितच भासते. ते जितके विचारी आणि मेहनती असतात, तितकेच परिस्थितीशी जुळवून घेणारेही. त्यामुळे ते कोणत्याही कठीण प्रसंगात स्वतःला नव्याने उभं करू शकतात.