श्वेता तिवारी ही एक अशी अभिनेत्री आहे जी जितकी तिच्या अभिनयासाठी चर्चेत असते, तितकीच तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. ‘कसौटी जिंदगी की’मधून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री आजही तिच्या सौंदर्यामुळे आणि फिटनेसमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मात्र, तिचं वैयक्तिक आयुष्य अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं. दोन लग्न आणि दोन्ही अयशस्वी ठरेल. या सगळ्या गोष्टी तिच्या नशिबाशी जोडल्या गेल्या. पण खरंच तिच्या या आयुष्याच्या घडामोडींमध्ये तिच्या जन्मतारखेचा आणि मुलांकाचा काही संबंध आहे का?

श्वेताचा जन्म 4 ऑक्टोबर 1980 रोजी झाला. ज्यामुळे तिचा मुलांक 4 आहे आणि याचे स्वामी ग्रह राहू आहे. राहू हा छायाग्रह असल्यामुळे तो गोंधळ, अस्थिरता आणि संघर्षाचं प्रतीक मानला जातो. यामुळे मुलांक 4 असलेले लोक अनेकदा आयुष्यात अडथळ्यांना तोंड देतात, विशेषतः नातेसंबंधांमध्ये.
मुलांक 4 आणि संघर्ष
मुलांक 4 असलेल्या व्यक्तींमध्ये एक वेगळी जिद्द आणि आत्मविश्वास असतो. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली, की ती पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाहीत. श्वेतानेसुद्धा लहान वयात काम सुरू केलं आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, या जिद्दी स्वभावामुळे अनेकदा त्यांच्या वैयक्तिक नात्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो. अशा लोकांना कोणीही नियंत्रित करायला गेलं, की ते बंडखोर होतात.
राहूचा प्रभाव असलेले लोक अनेकदा नातेसंबंधांमध्ये अस्थिरता अनुभवतात. काही वेळा त्यांचं लग्न उशिरा होतं, तर काही वेळा लग्नानंतर अनपेक्षित अडचणी निर्माण होतात. श्वेताचं दोन्ही लग्न अयशस्वी होणं ही या ग्रहदोषाची शक्यताही असू शकते. मुलांक 4 असलेले लोक हट्टी, स्वतंत्र विचारांचे आणि अनेक वेळा सल्ला न ऐकणारे असतात. त्यामुळे सहजीवनात मतभेद होणं सहज शक्य आहे.
श्वेता तिवारीचे करिअर
श्वेताने मात्र आपल्या करिअरमध्ये हार मानली नाही. दोन्ही लग्न अयशस्वी झाल्यानंतरही ती खंबीरपणे उभी राहिली. आज ती एक यशस्वी आई, अभिनेत्री आणि फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाते. मुलांक 4 असलेले लोक स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात आणि कितीही संकटं आली तरी डगमगत नाहीत.
4 क्रमांकाचे लोक थोडे हट्टी, स्वाभिमानी आणि समाजाच्या चौकटीच्या बाहेर विचार करणारे असतात. श्वेताची इमेजसुद्धा अशीच आहे. पारंपरिक मर्यादांना न जुमानता स्वतःची एक वेगळी वाट शोधणारी स्त्री.
या मूलांकचे लोक अभियांत्रिकी, विज्ञान, कलाक्षेत्र आणि नेतृत्त्वात चमक दाखवू शकतात. त्यांना कौतुक आणि स्वतःचा अभिमान असतो, पण हेच गुण अनेकदा त्यांचं आयुष्य गुंतागुंतीचं बनवतात.