‘या’ अंकाचे लोक सोन्यासारखं नशिब घेऊन जन्मतात; त्यांची मैत्री म्हणजे करोडपती होण्याची संधी! जाणून घ्या त्यांचे गुण आणि स्वभाव

Published on -

अंकशास्त्रामध्ये ‘6’ हा अंक अतिशय खास मानला जातो. जो कोणी 6,15 किंवा 24 तारखेला जन्म घेतो, त्याचा मूलांक 6 असतो. हा अंक शुक्र ग्रहाशी संबंधित असल्याने असे लोक सौंदर्यप्रेमी, विलासी, कलाप्रेमी आणि भावुक स्वभावाचे असतात. जीवनात त्यांना कधीच पैशाची कमतरता भासत नाही, इतकंच नव्हे तर ते ज्या व्यक्तींच्या संपर्कात येतात त्यांचंही नशीब फळफळतं.

मूलांक 6 चे आयुष्य

हे लोक सोनं, चांदी, हिरे, मोती यांसारख्या मौल्यवान वस्तूंच्या खरेदीमध्ये आनंद मानतात. त्यांना लक्झरी हॉटेल्स, ब्रँडेड कपडे आणि आलिशान जीवनशैलीचा मोह असतो. त्यांची फॅशन सेन्स जबरदस्त असते आणि फॅशन डिझायनिंग, दागिन्यांचा व्यवसाय किंवा चित्रसृष्टीत ते मोठं यश मिळवतात.

‘6’ क्रमांकाच्या लोकांना मेहनती आणि हुशार व्यापारी म्हटलं जातं. ते करोडोंची उलाढाल सहज करू शकतात. कपडे, हॉटेल्स किंवा सौंदर्यविषयक उत्पादनांच्या क्षेत्रात त्यांचा दबदबा असतो.

स्वभाव आणि गुण

असे लोक स्वभावाने आनंदी, आकर्षक आणि प्रेमळ असतात. त्यांचं स्मित, त्यांच्या बोलण्यातली ऊब हीच त्यांची खरी ओळख. ते चांगले श्रोते असतात आणि एकदा जर तुम्हाला त्यांच्या हृदयात स्थान मिळालं, तर ते तुमच्यासाठी पर्वत सुद्धा हलवू शकतात.

या अंकाचे लोक केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर इतरांसाठीही भाग्यवान ठरतात. ते मदतीस तत्पर असतात. त्यांच्या सल्ल्यामुळे किंवा ओळखीमुळे अनेकांना करिअरमध्ये यश मिळते.

करिअर

या मूलांकचे लोक चित्रपट, नाटक, फॅशन, संगीत, डिझायनिंग आणि मॉडेलिंगमध्ये आपली खास ओळख निर्माण करतात. त्यांची सौंदर्यदृष्टी आणि सर्जनशीलता अफलातून असते.

शुक्र ग्रहामुळे हे लोक वय वाढलं तरीही तरुण दिसतात. ते नेहमी टवटवीत आणि स्टायलिश असतात. तरुण वयातच त्यांना पैसा, यश आणि प्रेम मिळतं. हे लोक रोमँटिक असतात आणि मनापासून प्रेम करतात. मात्र घाईगडबडीत घेतलेले निर्णय त्यांच्या नात्यांमध्ये कधी कधी अडचणी निर्माण करू शकतात.

विशेष उपाय

शुक्रवार हा त्यांच्यासाठी विशेष शुभ दिवस असतो. हलका गुलाबी, पांढरा किंवा निळा रंग त्यांच्या भाग्याला चालना देतो. हिरा किंवा ओपल हे रत्न त्यांच्यासाठी फलदायी ठरते. जर त्यांनी शुक्रवारच्या दिवशी मंदिरात पांढरी फुले वाहिली आणि “ॐ शुं शुक्राय नमः” हा मंत्र जपला तर त्यांच्या जीवनात सौंदर्य, प्रेम आणि संपत्तीचा वर्षाव नक्कीच होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!