अंकशास्त्र म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नसून, तो आपल्या जीवनाच्या नकळत चालणाऱ्या प्रवाहाचा नकाशा असतो. या प्राचीन शास्त्रानुसार, काही विशेष संख्या अशा असतात की ज्या व्यक्तीच्या जीवनाला वेगळाच आयाम देतात. अंकशास्त्रात 1 ते 9 या मूलांकशी माणसाच्या जन्मतारखेचं एक अनोखं नातं असतं. ही संख्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडते. तुम्ही कसे विचार करता, कोणत्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात, आणि तुमच्या यशाचा मार्ग कसा असतो.

मूलांक 7
यापैकी मूलांक 7 हा विशेषतः अद्वितीय मानला जातो. ज्यांचा जन्म महिन्याच्या 7,16 किंवा 25 तारखेला झाला आहे, त्यांच्या आयुष्यात एक प्रकारचा तेजस्वी प्रकाश असतो. या मूलांकाचे लोक नुसतेच बुद्धिमान नसतात, तर त्यांची बुद्धिमत्ता विश्लेषणात्मक, खोल आणि अत्यंत प्रभावी असते.
त्यांचा मेंदू जणू एखाद्या संगणकासारखा कार्य करतो तर्कशुद्ध आणि नेमकं. हे लोक सहजासहजी कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत; ते प्रत्येक गोष्ट तपासतात, विचार करतात आणि मगच निर्णय घेतात. त्यामुळेच, त्यांच्या निर्णयामध्ये नेहमी स्थैर्य आणि सखोलता असते.
मूलांक 7 असलेल्यांचे जीवन मात्र केवळ विचारांनी सजलेले नसते, ते पैशाच्या बाबतीतही अतिशय भाग्यवान असतात. देवी लक्ष्मीचा जणू त्यांच्यावर कृपाछत्र असतो. त्यांच्या कष्टातून केवळ त्यांना स्वतःला नव्हे, तर कुटुंबालाही समृद्धीचा अनुभव येतो. ते सहसा आपली संपत्ती वाढवतात आणि आयुष्यातील प्रत्येक सुख उपभोगतात.
मूलांक 7 चा स्वभाव
मात्र, या लोकांचा एक पैलू असा असतो जो सर्वांनाच कळतो असं नाही. त्यांचं मन खूप खोल आणि रहस्यमय असतं. ते त्यांच्या भावना फारसे उघड करत नाहीत. बाहेरून शांत, गंभीर आणि थोडेसे अनभिज्ञ वाटणारे हे लोक प्रत्यक्षात मात्र खूप आध्यात्मिक असतात. त्यांना गोंधळ, गडबड आणि सतत चुळबुळ करणाऱ्या वातावरणापेक्षा शांततेत रमायला अधिक आवडतं.
मूलांक 7 असणारे हे लोक आयुष्यभर एका वेगळ्या लयीत चालतात. त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीत, स्वतःच्या नियमांनुसार. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, त्यांच्या मार्गात यश आणि धनाचा प्रवाह सतत वाहत असतो. त्यांच्या आयुष्याची वाटचाल ही केवळ आकड्यांच्या आधारावर नसते, तर ती नशीब आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा सुंदर संगम असतो.