PM नरेंद्र मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा रेकॉर्ड! भारताचे दुसरे सर्वाधिक काळचे पंतप्रधान, पहिल्या नंबरवर कोण?

Published on -

भारतीय राजकारणातील प्रत्येक टप्पा हा इतिहास घडवणारा असतो. आजच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा एक ऐतिहासिक टप्पा पार केला आहे की, ज्यामुळे ते देशाच्या राजकीय वाटचालीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरले आहेत.

सलग आणि दीर्घकाळ पंतप्रधानपदावर राहणाऱ्या नेत्यांच्या यादीत त्यांनी आता दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामुळे त्यांनी केवळ इंदिरा गांधींचाच विक्रम मोडला नाही, तर स्वतंत्र भारताच्या नेतृत्वाच्या गाथेत स्वतःचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं आहे.

नरेंद्र मोदी आणि इंदिरा गांधी

25 जुलै 2025 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदावरील 4,078 दिवस पूर्ण केले. ही संख्या केवळ एक आकड्यांची गणिती व्याख्या नाही, तर एका नेत्यानं देशासाठी दिलेल्या सातत्यपूर्ण नेतृत्वाची साक्ष आहे. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदावर सलग 11 वर्षे आणि 59 दिवस म्हणजे 4,077 दिवस सेवा दिली होती. मोदींनी त्या संख्येला मागे टाकत आपल्या राजकीय प्रवासात आणखी एक उच्चांक गाठला.

पंडित नेहरू टॉपवर

पण यादीतील सर्वोच्च स्थान अजूनही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याच नावावर आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी 15 ऑगस्ट 1947 पासून 27 मे 1964 पर्यंत एकूण 6,130 दिवस देशाची सेवा केली. नेहरूंच्या कार्यकाळात भारताला नव्याने उभं राहायचं होतं, तर मोदींच्या काळात भारताने जागतिक व्यासपीठावर आपली ओळख अधिक ठळक केली आहे.

डॉ. मनमोहन सिंग चौथ्या नंबरवर

या यादीत इंदिरा गांधी आणि मोदी यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव येते. 22 मे 2004 ते 26 मे 2014 या कालावधीत त्यांनी एकूण 3,654 दिवस पंतप्रधानपद भूषवले. त्यांनी आर्थिक सुधारणांपासून आंतरराष्ट्रीय नातेसंबंधांपर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर काम केलं.

अटलबिहारी वाजपेयी

पाचव्या क्रमांकावर असलेले अटलबिहारी वाजपेयी हे देखील भारतीय राजकारणातील एक अढळ स्थान असलेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी 19 मार्च 1998 पासून 22 मे 2004 पर्यंत एकूण 2,254 दिवस पंतप्रधान म्हणून देशाचं नेतृत्व केलं. त्यांच्या कार्यकाळात भारताने पोखरण अणुचाचणीसारख्या ऐतिहासिक घडामोडी पाहिल्या.

नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासात आणखी एक वैशिष्ट्य ठळकपणे दिसतं. सलग 6 निवडणुका जिंकण्याचा विक्रम. त्यांनी 2002, 2007 आणि 2012 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुका जिंकल्या आणि त्यानंतर 2014, 2019 व 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिलं. विशेष म्हणजे, ते भारताचे पहिले असे बिगर-काँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत, ज्यांनी सलग दोन वेळा पूर्ण बहुमतासह सरकार स्थापन केलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!