6 कोटींची बेंटले कार घ्यायला व्यापारी थेट हेलिकॉप्टरने आला ! व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

केरळमधील एका व्यावसायिकाने घेतलेली कार डिलिव्हरी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे, ह्याचा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. कोण आहेत हे व्यावसायिक ? काय आहे त्यांचा व्यवसाय आणि का गेले ते कार घेण्यासाठी हेलिकॉप्टरने ? समजून घेऊयात संपूर्ण माहिती...

Published on -

Poland Moosa Car Video : आपल्याकडं गाडी घ्यायला लोक शोरूममध्ये जातात, काहीजण ऑनलाइन ऑर्डर करतात, तर काही थेट घरपोच डिलिव्हरीची वाट पाहतात. पण केरळमधील एक व्यापारी आहे ज्याने या सगळ्या पद्धतींना बाजूला सारत, गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी थेट हेलिकॉप्टरने आगमन केलं. हो, ही गोष्ट खरी आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे पोलंड मुसा, ज्याला मुसा हाजी या नावानेही ओळखलं जातं.

मुसा हे फक्त नावाजलेले व्यापारी नाहीत, तर ते परफ्यूमच्या जागतिक व्यापारात एक मोठं नाव आहे. त्यांची कंपनी ‘Fragrance World’ ही परफ्यूम ब्रँड १३२ देशांमध्ये पोहोचली आहे. त्यांच्या कंपनीच्या ४,००० पेक्षा जास्त प्रकारच्या सुगंधांची विक्री होत असते. दुबई हे त्यांच्या व्यवसायाचं मुख्य केंद्र आहे आणि तिथेच त्यांच्या आलिशान जीवनशैलीची झलक पाहायला मिळते.

पण नुकतीच जी गोष्ट घडली ती थोडक्यात सांगायचं झालं, तर मे महिन्यात मुसा यांनी बेंटले बेंटायगा EWB ही सुपर लक्झरी एसयूव्ही खरेदी केली. गाडी मिळाली, पण ती घ्यायला ते गाडीने गेले नाहीत, तर थेट हेलिकॉप्टरनं उतरले. शोरूमच्या आवारात उतरलेल्या हेलिकॉप्टरमधून ते बाहेर पडले आणि डिलिव्हरीसाठी तयार असलेली बेंटले बेंटायगाजवळ गेले.

ती गाडी निळ्या कापडानं झाकलेली होती आणि ती उघडल्यावर समोर आली एक गुलाबी-सोनेरी रंगाची लक्झरी कार. हा क्षण जितका भव्य, तितकाच सिनेमॅटिक होता आणि साहजिकच, तो क्षण इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला.पण मुसा यांचं आगमन इतकंच नाही तर त्यांच्यासोबत जमिनीवर आलेल्या तीन लक्झरी गाड्यांचं ताफं सुद्धा लोकांचं लक्ष वेधून घेत होतं. त्यात रेंज रोव्हर, लँड रोव्हर डिफेंडर 110 आणि टोयोटा लँड क्रूझरसारख्या गाड्या होत्या.

खरंतर, मुसा यांना आलिशान गाड्यांचा प्रचंड छंद आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस कलिनन, रेंज रोव्हर व्होग, मर्सिडीज G63 AMG, आणि लेक्सस LX600 सारख्या गाड्यांचा समावेश आहे. हे सगळं त्यांच्या दुबईतील गॅरेजमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतं.

या साऱ्या प्रसंगावरून एक गोष्ट लक्षात येते मुसा हे केवळ श्रीमंतीचं प्रदर्शन करत नाहीत, तर आपली मेहनत, यश आणि स्टाईल यांचा अनोखा संगम मांडतात. सोशल मीडियावर त्यांना आता एक ‘लक्झरी आयकॉन’ म्हणून पाहिलं जातंय. भारतात असा एखादा उद्योजक आहे, जो मेहनतीचं फळ इतक्या दिमाखात साजरं करतो, हे पाहणं नक्कीच प्रेरणादायक आहे आणि थोडंसं थक्क करणंही!

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe