पंतप्रधान मोदींचं ‘एअर इंडिया वन’विमान जणू शाही महलच, सुरक्षा इतकी तगडी की आसपास पक्षीही भिरकणार नाही! किंमत किती?

Published on -

देशाच्या पंतप्रधानांची वारी म्हणजे केवळ एका नेत्याचा प्रवास नसतो, तर तो असतो भारताच्या प्रतिष्ठेचा, सुरक्षिततेचा आणि जागतिक व्यासपीठावर उभ्या असलेल्या राष्ट्राचा आत्मविश्वास दाखवणारा प्रवास. आणि त्या प्रवासासाठी जी साथसंगत असते, ती म्हणजे ‘एअर इंडिया वन’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे विमान केवळ एक हवाई साधन नाही, तर ते एक चालतं-फिरतं राजवाडं आहे, जे आकाशातसुद्धा अभेद्य किल्ल्याप्रमाणे भासते.

‘एअर इंडिया वन’ विमान

जेव्हा मोदी परदेश दौऱ्यावर निघतात, तेव्हा केवळ पंतप्रधानच नव्हे, तर संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सामावलेलं असतं. अशा प्रवासासाठी त्यांना हव्या असतात भक्कम सुरक्षा, अभूतपूर्व वेग, आणि अत्यंत सुसज्ज सोयी. ‘एअर इंडिया वन’ ही गरज केवळ पूर्ण करत नाही, तर त्या पलीकडे जाऊन एक नवा आदर्श निर्माण करते.

हे खास बोईंग 777 विमान भारताला 2020 मध्ये प्राप्त झालं. एका सामान्य प्रवाशाच्या नजरेतून पाहिलं, तर ते एका लक्झरी हॉटेलसारखं वाटेल पण त्याच्या आतील राजेशाही सजावट, यंत्रणांची काटेकोर मांडणी, आणि सुरक्षा व्यवस्थेच्या सुसज्जतेमुळे हे विमान खरंतर हवाई राजवाडा वाटतो.

खास वैशिष्ट्ये

या विमानात एकाचवेळी 17 तास सलग उड्डाण करण्याची क्षमता आहे. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आकाशात उड्डाण करत असतानाही या विमानात इंधन भरता येतं. म्हणजेच, काहीही झालं तरी हे विमान सहज थांबत नाही. आणि थांबलंच तर ते काही तांत्रिक अडचणींमुळे नव्हे, तर नियोजनपूर्वक असतं.

त्याचं आणखी एक आकर्षण म्हणजे त्यात बसवलेली LAIRCM प्रणाली. एक अशी तांत्रिक कवचव्यवस्था जी कोणताही क्षेपणास्त्र किंवा हवाई धोका जवळ येण्यापूर्वीच ओळखते आणि विमानाच्या संरक्षणासाठी सज्ज होते. या प्रणालीमुळे शत्रूच्या दृष्टिकोनातून हे विमान म्हणजे एक उडतं दुर्गच ठरतं.

किंमत किती?

या विमानाची किंमत ऐकली की अनेकांच्या भुवया उंचावतील, तब्बल 8,458 कोटी रुपये. पण ही किंमत केवळ त्याच्या साजशृंगारासाठी नव्हे, तर त्यात बसवलेल्या आधुनिक सुरक्षा यंत्रणांसाठी, तांत्रिक अपग्रेडसाठी आणि उच्च दर्जाच्या सुविधांसाठी आहे. याशिवाय, या विमानात 500 कोटी रुपयांची अतिरिक्त सुधारणा करण्यात आली आहे, ज्यात त्याचे अंतर्गत रचना आणि संरक्षण उपकरणांचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!