तब्बल ₹24,000 ने स्वस्त झाला सॅमसंगचा ‘हा’ दमदार फोन, फ्लिपकार्ट GOAT सेलमध्ये बंपर ऑफर सुरु!

Published on -

जर तुम्ही नव्या आणि दमदार स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर सध्या सुरू असलेल्या Flipkart च्या GOAT सेलमध्ये तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. सॅमसंगच्या दोन सर्वाधिक लोकप्रिय स्मार्टफोन मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट जाहीर करण्यात आली असून, आता हे फोन्स तब्बल ₹24,000 पर्यंत स्वस्त मिळत आहेत. म्हणजेच, आजवर पाहिलेल्या सवलतींपैकी ही एक मोठी ऑफर ठरू शकते.

या सेलमध्ये Galaxy S24 FE 5G आणि Galaxy A35 5G या दोन मॉडेल्सवर जबरदस्त सवलत दिली जात आहे. ज्यांना Samsung चा ब्रँड, दमदार कॅमेरा, आकर्षक डिस्प्ले आणि दीर्घकालीन अपडेट्स हवे आहेत, त्यांच्यासाठी हे दोन फोन अगदी परिपूर्ण पर्याय ठरू शकतात. विशेष म्हणजे, या डिव्हाईसवर केवळ थेट सवलतच नाही, तर बँक ऑफर्स, नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज बोनसही मिळत आहे. त्यामुळे ही एक चूकवू नये अशी संधी आहे.

Galaxy S24 FE 5G

Galaxy S24 FE 5G बद्दल बोलायचं झालं, तर त्याचा 8GB RAM + 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट ₹59,999 ला लाँच झाला होता. पण सध्या तो ₹35,999 मध्ये मिळतोय. म्हणजेच तब्बल ₹24,000 ची थेट बचत. त्यात अजून बँकेचे डिस्काउंट जोडले तर किंमत आणखी खाली येते. या फोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेटमुळे अनुभव अगदी स्मूद मिळतो. त्यात Exynos 2400E प्रोसेसर दिला आहे जो गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उत्तम आहे. फोटोग्राफीच्या बाबतीत, या फोनमध्ये OIS असलेला 50MP प्रायमरी सेन्सर आहे, त्याला 8MP टेलिफोटो कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा वाइड सेन्सरची साथ आहे. सेल्फीसाठी 10MP फ्रंट कॅमेरा आहे.

या फोनची खरी ओळख म्हणजे यामध्ये मिळणारे Galaxy AI फीचर्स ज्यात सर्कल टू सर्च, लाईव्ह ट्रान्सलेट, नोट असिस्ट, इंटरप्रिटर मोड आणि कंपोझर यांसारखी स्मार्ट यंत्रणा आहे. सॅमसंगने यावर तब्बल 7 वर्षांचे OS अपडेट्स देण्याचं वचन दिलं आहे म्हणजे फोन दीर्घकाळ चालणार हे नक्की.

Galaxy A35 5G

दुसरा फोन, Galaxy A35 5G, जो की सुरुवातीला ₹30,999 मध्ये लाँच झाला होता, आता सेलमध्ये केवळ ₹19,999 ला मिळतोय. म्हणजेच एकूण ₹11,000 ची बचत. यामध्ये 6.6-इंचाचा Super AMOLED डिस्प्ले आणि 120Hz चा रिफ्रेश रेट आहे. 50MP + 8MP चा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि 13MP फ्रंट कॅमेरा हे या फोनचं खास वैशिष्ट्य. शिवाय, IP67 रेटिंग असल्यामुळे हा फोन पाण्यापासून आणि धुळीपासून सुरक्षित राहतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!