सौंदर्यात अभिनेत्रींनाही मागे टाकणाऱ्या सारा तेंडुलकरचं ब्युटी सिक्रेट उघड!’या’ उपायाने तुम्हालाही मिळू शकते ग्लोइंग स्कीन

Published on -

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरने अजून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं नसतानाही, तिच्या सौंदर्यामुळे ती कायमच प्रकाशझोतात असते. सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते मंत्रमुग्ध होतात. तिची नितळ त्वचा आणि ताजेपणा पाहून अनेकजण विचारात पडतात, तिचं हे सौंदर्याचं रहस्य नेमकं आहे तरी काय?

अनेकदा असे वाटते की सेलिब्रिटींचं सौंदर्य काही खास, महागड्या उपचारांमुळे असतं. पण साराने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत एक साधा आणि स्वस्त उपाय सांगितला आहे, ज्यामुळे तिची त्वचा इतकी तजेलदार आणि चमकदार दिसते. तिच्या म्हणण्यानुसार, सौंदर्याचं हे गुपित कोणतीही महागडी क्रीम किंवा सर्जरी नाही, तर एक घरगुती पेय आहे. तो आहे मॅचा प्रोटीन स्मूदी.

Matcha Protein Smoothie

या स्मूदीसाठी फारशा क्लिष्ट गोष्टींची गरज नाही. सारा सांगते की, ती दररोज बदामाचं दूध, एक केळी, थोडं मध, चिया बियाणं आणि थोडे ओट्स यांचं मिश्रण करून ही स्मूदी तयार करते. हे सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये एकत्र करून काही क्षणांत एक पोषणयुक्त आणि स्वादिष्ट पेय तयार होतं, जे तिच्या त्वचेला आतून पोषण देतं.

या स्मूदीचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स विशेषतः कॅटेचिन. हे त्वचेमधील विषारी घटक बाहेर टाकतात आणि त्वचेला स्वच्छ, उजळ आणि आरोग्यदायी बनवतात. यासोबतच ही स्मूदी पचनासाठीही उत्तम असून दीर्घकाळ भूक लागत नाही, त्यामुळे फिटनेस टिकवण्यासाठीही मदत होते.

सेवन कधी कराल?

सारा सांगते की ही स्मूदी सकाळी नाश्त्यामध्ये किंवा वर्कआउटनंतर घेणं सर्वोत्तम ठरतं. यातून शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वं, खनिजद्रव्यं आणि निरोगी फॅट्स मिळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही एक सवय कुणीही सहज अंगीकारू शकतो. महागड्या सौंदर्यप्रसाधनांच्या तुलनेत ही एक नैसर्गिक आणि किफायतशीर पर्याय आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!