या वर्षीचा श्रावण महिना काहीसा वेगळाच आहे. दरवर्षी श्रावण म्हटलं की भक्तीचा गजर, भोलेनाथाचं पूजन आणि शांतीचा अनुभव असतो. पण यंदाच्या श्रावणात एक असा दुर्मीळ योग बनतोय, जो तब्बल 70 वर्षांनंतर घडत आहे. भारतातल्या ज्योतिषशास्त्रानुसार, एकाच वेळी चार प्रमुख ग्रहांचा वक्री होणं म्हणजे उलट्या दिशेने चालणं ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट आहे. आणि यंदा शनि, राहू, केतू आणि बुध हे चारही ग्रह वक्री स्थितीत आहेत. ही योगायोगाची वेळ काही निवडक राशींवर विशेष कृपादृष्टी घेऊन येणार आहे. या राशींना केवळ आर्थिकच नाही, तर वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातही प्रगतीचा अनुभव येणार आहे.

सध्या शनि मीन राशीत वक्री आहे आणि तो नोव्हेंबर अखेरपर्यंत तिथेच राहणार. बुधदेखील कर्क राशीत वक्री होईल आणि ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात त्याची गती पूर्ववत होईल. राहू आणि केतू तर कायमच वक्री असतात. त्यातील राहू कुंभमध्ये आणि केतू सिंह राशीत आहे. हे चार ग्रह अशा विशिष्ट मार्गक्रमणात एकत्र असल्यामुळे काही राशींना या काळात अक्षरशः नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या व्यक्तींना हा काळ फारच लाभदायक ठरणार आहे. कामात स्थैर्य, नोकरीत पदोन्नती, तसेच जुने अडकलेले पैसे मिळण्याचे योग तयार होत आहेत. काहींना नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि कुटुंबात सुखशांतीचे वातावरण निर्माण होईल. जे उद्योगधंद्यात आहेत, त्यांना विशेष लाभ मिळेल, तर जे नोकरी शोधत होते त्यांच्यासाठीही ही वेळ संधी घेऊन येईल.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ मनापासून समाधान देणारा ठरेल. गेल्या काही महिन्यांपासून चालत असलेल्या वैयक्तिक अडचणींना आता उतार लागेल. खासकरून वैवाहिक जीवनात नवीन उमेदीने प्रेम वाढेल. शिवकृपेने या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो आणि नोकरीमध्ये अनपेक्षित संधी प्राप्त होऊ शकते.
कन्या राशी
कन्या राशीच्या जातकांसाठी श्रावण महिना अनेक स्वप्नं पूर्ण करणारा ठरेल. अनेक जण नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार करतात, तर काहींची ही इच्छा प्रत्यक्षात येईल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान आणि वरिष्ठांची प्रशंसा मिळेल. कोणत्याही प्रकल्पात दिलेली मेहनत व्यर्थ जाणार नाही. विशेषतः आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने हा काळ घसघशीत फायदा करून देणारा ठरेल.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांनीही मोठ्या आशेने या महिन्याकडे पाहावं. पूर्वीचे तणाव दूर होतील आणि मनःशांती मिळेल. काही जुने प्रश्न सुटतील आणि वैयक्तिक नातेसंबंध अधिक घट्ट होतील. काही लोकांना नवीन व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते, तर काहींचा पूर्वीचा व्यवसाय पुन्हा नफ्यात येऊ शकतो. एकंदरीत, मीन राशीच्या लोकांसाठी श्रावणचा हा काळ नवी ऊर्जा आणि नवीन सुरुवात घेऊन येईल.
या सर्व राशींना या काळात शिवभक्तीला अधिक महत्त्व द्यावं, आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा आणि श्रद्धेने मार्गक्रमण करावं. कारण अशा दुर्लभ योगांचे लाभ फारच भाग्यवान लोकांनाच मिळतात. यंदा हे भाग्य काहींच्या दारात आलं आहे, फक्त त्याची ओळख ठेवण्याची आणि योग्य वेळी पाऊल उचलण्याची गरज आहे.