दररोज फक्त ₹300 ची बचत तुम्हाला बनवू शकते करोडपती; जाणून घ्या स्मार्ट गुंतवणुकीचा सोपा फॉर्म्युला!

Published on -

आजकाल प्रत्येक तरुणाचं एक स्वप्न असतं आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणं, म्हणजेच एवढं धनसंपन्न होणं की नोकरी करायची गरजच उरणार नाही. पण या स्वप्नासाठी कोणताही शॉर्टकट नाही. मेहनत, शिस्त, आणि मुख्यतः गुंतवणुकीचं योग्य नियोजन हे यामागचं खरं गुपित आहे. आता कल्पना करा, जर तुम्ही महिन्याला फक्त 9,000 रुपये बाजूला काढले, तर 21 वर्षांनंतर तुम्ही करोडपती होऊ शकता. हे ऐकायला जरी थोडं अविश्वसनीय वाटत असलं, तरी गणित सरळ आहे, फक्त गरज आहे ती सातत्याची.

समजा तुम्ही 25 वर्षांचे आहात, आणि नुकतीच नोकरी सुरू केली आहे. जर तुम्ही रोज केवळ 300 रुपये बाजूला ठेवले, तर महिन्याला 9,000 रुपये बचत करता येईल. ही रक्कम जर तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये गुंतवली, तर ती तुम्हाला पुढील 21 वर्षांत करोडपती बनवू शकते. SIP हा एक असा मार्ग आहे ज्यात प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून, चक्रवाढ परताव्याच्या मदतीने मोठा निधी उभा केला जाऊ शकतो.

या उदाहरणात जर तुम्ही 12% वार्षिक परतावा गृहीत धरला, तर 21 वर्षांत तुमची गुंतवलेली रक्कम जवळपास 22.68 लाख होईल. मात्र या काळात मिळालेला चक्रवाढ परतावा तुम्हाला एकूण 1.02 कोटी रुपये मिळवून देऊ शकतो. हीच SIP ची जादू आहे. वेळ जितका जास्त, चक्रवाढीचा प्रभाव तितकाच प्रभावी.

‘लाभांश पुनर्गुंतवणूक योजना’

तुम्हाला आणखी फायदे हवे असतील तर ‘लाभांश पुनर्गुंतवणूक योजना’ निवडता येते. या योजनेत, तुम्हाला मिळणारा नफा पुन्हा त्या गुंतवणुकीतच वापरला जातो. परिणामी, मूळ रक्कम वाढत जाते आणि परतावाही अधिक मिळतो. हे दरवर्षी 2% ते 6% पर्यंत वाढवू शकते, मात्र तो दर फंडाच्या निवडीवर आणि बाजाराच्या स्थितीवर अवलंबून असतो.

रेक्यरिंग डिपॉझिट (RD)

जर SIP पेक्षा दुसरा पर्याय शोधत असाल, तर रेक्यरिंग डिपॉझिट (RD) देखील चांगला मार्ग ठरू शकतो. समजा तुम्ही दरमहा 5,500 रुपये RD मध्ये गुंतवले, आणि 9% दराने व्याज मिळत राहिलं, तर तुम्ही 30 वर्षांत करोडपती बनू शकता. हे तुलनेत अधिक काळ घेणारे असले, तरी ते देखील एक शिस्तबद्ध आणि सुरक्षित मार्ग आहे.

एकूणच पाहिलं तर, करोडपती होण्यासाठी फार मोठा पगार लागतो असं नाही. लागते ती इच्छा, नियोजन, आणि संयम. तुमचं वय जितकं कमी, तितका फायदा जास्त. आजपासूनच जर तुम्ही बचतीची सवय लावली, तर उद्याचं भवितव्य स्वतःच घडवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!