कंटाळवाण्या 9 ते 5 च्या नोकरीला करा गुडबाय; ‘हे’ 5 हटके करिअर ऑप्शन्स देतील लाखोंचा पैसा!

Published on -

दररोज सकाळी 9 वाजता ऑफिसला जायचं, ट्रॅफिकमध्ये अडकायचं, लंचब्रेक गमवायचा, डेडलाइनचा ताण घ्यायचा आणि संध्याकाळी 6 नंतर थकल्याभागल्या घराकडे परत यायचं. ही अनेकांच्या जीवनाची रोजची कहाणी आहे. काही लोकांसाठी हे स्थिरतेचं लक्षण असलं, तरी अनेकांना ही नोकरी “सुरक्षित पिंजरा” वाटतो. अशा वेळी, मनात अनेकदा प्रश्न उमटतो “आपण आयुष्यभर असंच जगायचं का?”

 

जर तुम्ही देखील या एकसुरी आयुष्यातून बाहेर पडण्याचा विचार करत असाल, आणि काहीतरी हटके, मजेदार, पण कमाईतही उत्तम असं करियर शोधत असाल, तर काही ‘ऑफबीट’ करिअर पर्याय तुमचं आयुष्य बदलू शकतात. हे करिअर एकतर तुमच्या आवडीतून सुरू होतात किंवा तुमच्या छंदातून व्यवसायात रूपांतरित होतात.

फूड ब्लॉगिंग

उदाहरण द्यायचं झालं, तर फूड ब्लॉगिंग ही एक अशी वाट आहे, जी जेवणाची आवड असलेल्या लोकांसाठी खूपच आकर्षक ठरते. फक्त खाणं नाही, तर खाण्याबद्दल बोलणं, नव्या रेसिपीची चव घेणं, त्यावर आपली प्रतिक्रिया देणं हे सारं करताना तुम्ही तुमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल किंवा ब्लॉग सुरू करू शकता. जाहिराती, प्रायोजक, रेस्टॉरंट रिव्ह्यू याच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

ट्रॅव्हल व्लॉगिंग किंवा ब्लॉगिंग

याच धर्तीवर ट्रॅव्हल व्लॉगिंग किंवा ब्लॉगिंग हा ही एक असा व्यवसाय आहे जो फिरायची आवड असलेल्यांसाठी आदर्श ठरतो. सुंदर स्थळांवर भटकंती करतानाच तुमच्या अनुभवांचं शब्दांमध्ये किंवा व्हिडिओमध्ये सादरीकरण करणं, हे तुम्हाला केवळ आनंदच नाही तर आर्थिक स्वातंत्र्यही देऊ शकतं.

पेट सिटर किंवा डॉग वॉकर

 

प्राण्यांवर प्रेम असलेल्यांसाठी तर पेट सिटर किंवा डॉग वॉकरसारखं करिअर म्हणजे स्वप्नासारखं आहे. हे काम थकवणारं नसतं, उलट त्यातून शांतता आणि समाधान मिळतं. हल्ली मोठ्या शहरांमध्ये लोक ऑफिसला जाताना त्यांचे पाळीव प्राणी तुमच्याकडे सोपवतात. यातून तुम्हाला वेळेवर आणि सन्माननीय कमाई होते.

इव्हेंट प्लॅनिंग

तुम्हाला जर लोकांच्या आनंदात आनंद वाटत असेल आणि तुम्ही नेहमी गोष्टी नीटनेटक्या ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, तर इव्हेंट प्लॅनिंगसारखं करिअर तुमच्यासाठी योग्य ठरू शकतं. लग्न समारंभ, वाढदिवसाच्या पार्टीज, ऑफिस इव्हेंट्स अशा अनेक छोट्या-मोठ्या प्रसंगांमध्ये तुमचं नियोजन कौशल्य लोकांना त्यांच्या खास क्षणांसाठी हवंच असतं.

ऑनलाइन ट्यूटर

आणि हो, शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल, पण शाळा-कॉलेजमध्ये जाऊन शिकवायचं नसेल, तरी तुम्ही ऑनलाइन ट्यूटर बनू शकता. जसं आज ऑनलाईन शिक्षणाची मागणी वाढतेय, तसं घरबसल्या शिकवून पैसा कमावण्याची संधीही वाढतेय. तुम्ही तुमचं ज्ञान अभ्यासक्रमात बदलून ते ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!