भारतात मधुमेह म्हणजे एक घराघरात शिरलेला संकटाचाच विषय झाला आहे. लहानांपासून तरुणांपर्यंत आणि वृद्धांपर्यंत अनेक जण या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. एकदा का मधुमेह जडला की आयुष्यभर रक्तातील साखरेवर लक्ष ठेवावे लागते. पण यावर निसर्गानेही काही चमत्कारी मदतीचे हात दिले आहेत. असाच एक साधा पण प्रभावी उपाय म्हणजे पेरूची पाने. आयुर्वेदात याचा उल्लेख वर्षानुवर्षांपासून होत आला आहे. पण हल्लीच काही वैद्यकीय अभ्यासांनीही याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

भारतात दिवसागणिक मधुमेहाचे रुग्ण वाढत चालले आहेत. पूर्वी जिथे हा आजार वयस्कांमध्ये दिसायचा, तिथे आता कॉलेजमधील तरुणही इन्सुलिनच्या गोळ्यांवर जगू लागले आहेत. सततचा तणाव, चुकीच्या वेळेवर खाणं, व्यायामाचा अभाव, हे सगळं मिळून रक्तातील साखरेच्या असंतुलनाला कारणीभूत ठरत आहे. आणि जेव्हा रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही, तेव्हा हृदयविकार, किडनीचे रोग, दृष्टी कमी होणे किंवा स्ट्रोकसारखे गंभीर धोके समोर उभे राहतात.
पेरूची पाने
अशा वेळी जर काही नैसर्गिक उपायांनी रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळू शकत असेल, तर तो मार्ग नक्कीच विचारात घ्यायला हवा. यासाठीच आज पेरूच्या पानांची विशेष चर्चा होते आहे. या हिरव्या साध्याशा पानांमध्ये असे काही गुणधर्म असतात जे शरीरात साखरेचे शोषण थांबवण्यास मदत करतात. शिवाय, ते इन्सुलिनच्या उत्पादनालाही उत्तेजन देतात, जे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं.
वापरण्याची पद्धत
तज्ज्ञांच्या मते, पेरूची पाने उकळून त्याचे पाणी दररोज सकाळी उपाशीपोटी पिल्यास खूप फरक पडतो. ही सवय लावून घेतल्यास काही दिवसांतच रक्तातील साखरेत स्थिरता जाणवते. काहीजण ही पाने धुवून त्यापासून हर्बल टी बनवतात, जी चवीलाही छान लागते आणि शरीरासाठीही फायदेशीर ठरते. काहीजण रिकाम्या पोटी ही पाने चावून खातात, त्यामुळे फक्त मधुमेहच नव्हे, तर कोलेस्टेरॉलही नियंत्रणात राहतो.
पेरूच्या पानांमध्ये भरपूर फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात. यामुळे ते शरीरातील मेटॅबॉलिझम सुधारते आणि पचनक्रियाही सुलभ होते. हे पाहता, पेरूची पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी केवळ एक पर्याय नसून, एक नैसर्गिक वरदान आहे असं म्हणायला हरकत नाही.
मात्र, कोणताही नैसर्गिक उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुरू करू नये. पेरूची पाने तुमच्यासाठी योग्य आहेत की नाही, यासाठी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास योग्य ठरेल. कारण, प्रत्येकाची शरीर रचना ही वेगळी असते.