‘ही’ आहे क्रिकेट जगातील सर्वात सुंदर स्पोर्ट्स अँकर, सौंदर्य असं की बॉलीवूड अभिनेत्रीही दिसतील फिक्या!

Published on -

भारतात क्रिकेट खेळाला अक्षरश: पूजले जाते. क्रिकेटपटूंना इथे चित्रपटातील कलाकारांसारखाच फॅनडम मिळतो. याच क्रिकेट जगतात स्पोर्ट्स अँकरलासुद्धा महत्वाचे स्थान असते. साध्या सोशल मीडियावर अशाच एका मोठ्या चेहऱ्याची प्रचंड चर्चा सुरू आहे. तिचं नाव आहे येशा सागर. एक अशी व्यक्ती जिच्या सौंदर्याने, बोलण्याच्या शैलीने आणि उपस्थितीने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष पूर्णपणे वेधून घेतलं आहे.

कोण आहे येशा सागर?

येशा सागर ही फक्त स्पोर्ट्स अँकर नसून, ती एक मॉडेल, अभिनेत्री आणि फिटनेस इन्फ्लुएंसर देखील आहे. ती ज्या आत्मविश्वासाने क्रिकेट ग्राउंडवर उभी राहते, त्याच ताकदीने ती कॅमेरासमोर अभिनय करते किंवा फिटनेस संदर्भातील प्रेरणादायी व्हिडीओ बनवते. तिचा प्रवास लुधियानापासून सुरू झाला.

2015 साली ती भारतातून कॅनडाकडे वळली, पुढील शिक्षणासाठी. शिक्षणाबरोबरच तिने ग्लोबल टी20 कॅनडा, उत्तर प्रदेश टी20 लीग आणि बांगलादेश प्रीमियर लीग यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

येशा सागरचा प्रवास

येशा सागरचा इंस्टाग्राम अकाउंट हा तिच्या विविध रूपांचं द्योतक आहे. कधी ती पारंपरिक पंजाबी पोशाखात दिसते, तर कधी मॉडर्न लूकमध्ये, पण प्रत्येक वेळेस ती आपल्या स्टाईलने चाहत्यांच्या मनात ठसा उमटवते. तिचे 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स हे तिच्या लोकप्रियतेचं जिवंत उदाहरण आहेत. याशिवाय, ती परमिश वर्मा, गुड सिद्धू, गिप्पी ग्रेवाल यांसारख्या लोकप्रिय पंजाबी कलाकारांसोबत म्युझिक व्हिडिओंमध्येही झळकली आहे.

क्रिकेट प्रेझेंटरच्या रूपात येशाची उपस्थिती मैदानात जितकी लक्षवेधी असते, तितकंच तिचं व्यक्तिमत्त्वही प्रेरणादायी आहे. त्यामुळे, येशा सागर ही सर्वात सुंदर आणि प्रतिभाशाली स्पोर्ट्स अँकर म्हणून ओळखली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!