बॉलिवूडमध्ये असे अनेक चेहरे आहेत जे एका चित्रपटाने लोकांच्या मनात घर करूनही अचानकच या क्षेत्रातून गायब झाले. अशीच एक अभिनेत्री म्हणजे गायत्री जोशी,

जिने शाहरुख खानसोबत ‘स्वदेस’ या चित्रपटात प्रभावी पदार्पण केलं आणि पाहता पाहता स्टारडम मिळवलं. मात्र या यशानंतर तिने चित्रपटसृष्टीला कायमचा अलविदा केला आणि आज ती तब्बल 50,000 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.
गायत्री जोशी
गायत्री जोशीने आपली सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. ती फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल 2000 ची विजेती होती आणि त्यानंतर तिने मिस इंटरनॅशनल 2000 मध्ये भारताचं प्रतिनिधित्वही केलं.
अशा यशस्वी सौंदर्यस्पर्धेनंतर गायत्रीने थेट बॉलिवूडमध्ये शाहरुख खानसोबत ‘स्वदेस’मधून एंट्री केली. तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक झालं.
‘स्वदेस’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही, पण त्याचा दर्जा आणि विषय आजही लोकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटाची नायिका गायत्री, जी त्यावेळी सहजपणे अनेक चित्रपट साइन करू शकली असती,
तिने अचानक चित्रपटसृष्टीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. काही आठवड्यांतच तिने उद्योगपती विकास ओबेरॉय याच्याशी लग्न केलं आणि ग्लॅमरच्या दुनियेला मागे टाकलं.
विकास ओबेरॉय कोण?
विकास ओबेरॉय हे ओबेरॉय रिअल्टी या भारतातील एक प्रमुख रिअल इस्टेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही कंपनी देशातील लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमध्ये अग्रेसर आहे.
फोर्ब्स आणि हुरुनच्या यादीत विकास ओबेरॉय यांचे नाव देशातील श्रीमंत उद्योजकांमध्ये गणले जाते. त्यांच्या संयुक्त मालमत्तेचा अंदाज 50 हजार कोटी रुपये इतका आहे.
आज गायत्री जोशी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. ती मुंबईत आपल्या पती आणि दोन मुलांसोबत एक खाजगी आणि साधं जीवन जगते. बॉलिवूडपासून दूर असलेली गायत्री जोशी ही आजही तिच्या स्वदेशमधील अभिनयासाठी ओळखली जाते.