श्रावण महिना सुरु झाला की सगळीकडे भक्तिमय वातावरण तयार होतं. श्रावण म्हणजे केवळ पावसाळा नाही, तर तो काळ असतो आत्मिक शांतीचा, भक्तीचा आणि देवाशी गहिरे नाते जोडण्याचा. याच महिन्यात भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी लाखो भक्त विविध प्रकारच्या पूजाअर्चा करतात. पण फार थोड्यांना माहिती असतं की हा महिना केवळ भोलेनाथाची कृपा मिळवण्यापुरता मर्यादित नाही. पितृदोष दूर करण्यासाठीही श्रावण अतिशय प्रभावी काळ मानला जातो. जर आयुष्यात सतत अडथळे येत असतील, यश दुरावत असेल आणि मनात शांतता नसेल, तर त्यामागे पितृदोष असण्याची शक्यता असते. अशा वेळी या पवित्र महिन्यात काही धार्मिक उपाय केल्यास आयुष्यातले अंधार दूर होऊ शकतात.

“ॐ नमः शिवाय” मंत्र
श्रावण महिन्याच्या प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी “ॐ नमः शिवाय” हा मंत्र मनोभावे जपणं अत्यंत फलदायी मानलं जातं. हे केवळ एक धार्मिक कर्तव्य नसून, त्या मंत्राच्या प्रत्येक जपामध्ये एक अद्भुत शक्ती असते, जी मनाला शांत करते, अंतर्मन शुद्ध करतं आणि भोलेनाथाची कृपा मिळवून देतं. जर हा जप रुद्राक्षाच्या माळेने केला, तर त्याचा प्रभाव आणखी वाढतो. असं मानलं जातं की या साधनेमुळे केवळ भगवान शिवच नव्हे, तर आपले पूर्वजही प्रसन्न होतात.
शिवलिंगावर दररोज जलाभिषेक करा
शिवलिंगावर दररोज जलाभिषेक करणं ही देखील एक अत्यंत श्रद्धेची कृती आहे. पावसाळ्याच्या या महिन्यात, पाण्याला एक वेगळीच शुद्धता लाभते, आणि त्यात जर थोडं दूध मिसळून ते शिवलिंगावर अर्पण केलं, तर त्या पूजेला अधिक पुण्य लाभतं. जल अर्पण करताना आपल्या मनात “ॐ नमः शिवाय” हा मंत्र सुरू ठेवला, तर त्याचा परिणाम अधिक गहिरा होतो. ही क्रिया केवळ धार्मिक विधी नसून ती एक आत्मिक संवाद असतो. आपल्याला ग्रासून टाकणाऱ्या पितृदोषाशी शांतपणे सामोरे जाण्याचा प्रयत्न असतो.
पिंपळाखाली दिवा लावा
शनिवारी, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणं हे एक पुरातन आणि श्रध्दास्थानी परंपरा आहे. पिंपळ हे झाड आपल्या संस्कृतीत अत्यंत पवित्र मानलं जातं. त्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यावर आणि झाडाची प्रदक्षिणा घातल्यावर आपले पूर्वज प्रसन्न होतात असं मानलं जातं. विशेषतः अशा दिव्य पूजेमुळे घरात सुख-समृद्धी येते, मन शांत राहतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.
श्रावणच्या प्रत्येक संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला चौमुख दिवा लावणं ही एक सुंदर भावना आहे. आपले पूर्वज या दिशेला वास करत असल्याचं शास्त्र सांगतं आणि त्या दिशेला प्रकाश देणं म्हणजे त्यांना आदरपूर्वक आमंत्रण देणं, त्यांची आठवण ठेवणं. या दिव्याच्या प्रकाशात केवळ घर उजळत नाही, तर आपल्या जीवनातील अंधारही हळूहळू निघून जातो. त्यांच्या आशीर्वादाने आपलं जीवन स्थिर आणि समृद्ध होतं.