इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळणं ही कोणत्याही फलंदाजासाठी मोठी कसोटी असते. अशा कठीण परिस्थितींमध्ये भारताच्या काही फलंदाजांनी इंग्लिश भूमीवर दमदार कामगिरी करून आपली छाप सोडली आहे. अलीकडे शुभमन गिलच्या जोरदार बॅटिंगने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. गिलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कमाल करत अनेक दिग्गजांची नावे मागे टाकली आहेत. पाहुया इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 भारतीय फलंदाज कोणते आहेत.

शुभमन गिल
भारताचा युवा कसोटी कर्णधार शुभमन गिल सध्या इंग्लंड दौऱ्यावर धडाकेबाज कामगिरी करत आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पहिल्या 3 कसोटींमध्ये त्याने 2 शतकं आणि एक भव्य द्विशतक ठोकलं असून त्याच्या खात्यात तब्बल 607 धावा जमा आहेत. त्यामुळे तो सध्या इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे त्याने हा पराक्रम करत राहुल द्रविडचा 23 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.
राहुल द्रविड
राहुल द्रविडचा विक्रम 2002 साली इंग्लंड दौर्यात 6 डावांत 602 धावा करत घडवण्यात आला होता. त्यावेळी त्याने 100.3 च्या सरासरीने खेळी केली होती. त्याचा तो विक्रम गेल्या दोन दशकांहून अधिक काळ टिकून होता.
विराट कोहली
विराट कोहलीने 2018 च्या इंग्लंड दौऱ्यात 5 कसोटीत 593 धावा ठोकल्या होत्या. त्याने अनेक कठीण परिस्थितीत टीम इंडियाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
सुनील गावस्क
या यादीत सुनील गावस्कर यांचेही नाव आदराने घेतले जाते. 1979 च्या दौऱ्यात त्यांनी 77.4 च्या प्रभावी सरासरीने 7 डावांत 542 धावा केल्या होत्या. त्यांच्या तंत्रशुद्ध फलंदाजीमुळे इंग्लंडच्या गोलंदाजांनाही घाम फुटला होता.
पुन्हा एकदा राहुल द्रविड यांचे नाव यादीत झळकते. 2011 च्या दौऱ्यातही त्यांनी 8 डावांत 461 धावा करत आपली कसोटीमधील सातत्याची ओळख कायम ठेवली होती.