जर तुम्ही तुमच्यासाठी एक स्टायलिश, स्मार्ट आणि बजेटमध्ये बसणारे स्मार्टवॉच शोधत असाल, तर सध्या Flipkart वर सुरु असलेली Fastrack घड्याळांची धमाकेदार सूट नक्की तुमच्यासाठीच आहे. Fastrack ब्रँडने आपल्या वेगळ्या डिझाईनसाठी आणि युझर-फ्रेंडली तंत्रज्ञानासाठी आधीपासूनच बाजारात खास ओळख निर्माण केली आहे. आणि आता, त्यांच्या टॉप स्मार्टवॉचेस अगदी 1499 रुपयांपासून उपलब्ध आहेत.

आजच्या घड्याळांमध्ये केवळ वेळ दाखवणे हा उद्देश राहिलेला नाही, तर ते तुमच्या आरोग्याची काळजी घेतात, कॉल्स हाताळतात आणि तुमचा फिटनेस साथीदारही बनतात. त्यामुळे Fastrack च्या या खास सवलती तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.
टॉप डील्स
ज्यांची सुरुवातच 1499 रुपये इतक्या कमी किंमतीपासून होते, अशा या घड्याळांमध्ये “Revolt XR1” आणि “Revolt FS1” हे दोन मॉडेल्स सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत. या दोघांमध्ये स्टायलिश डिझाईन, ब्लूटूथ कॉलिंग आणि AI व्हॉइस असिस्टंटसारख्या स्मार्ट फीचर्स मिळतात. इतकंच नाही तर, 1.85 इंचाचा ब्राइट डिस्प्ले आणि स्मूथ इंटरफेस यामुळे युजिंगचा अनुभवही खूपच आकर्षक होतो.
थोडं वरच्या किमतीत पाहायचं झालं, तर 1599 रुपयांना “Revolt FS2+” हे मॉडेल मिळतं, ज्यामध्ये 2.01 इंचाचा मोठा डिस्प्ले आणि IP68 रेटिंग आहे. पाण्यापासून संरक्षण हवं असेल, तर ही निवड खूपच योग्य ठरेल.
“Revolt” आणि “Vigor” या मॉडेल्समध्ये ब्लूटूथ कॉलिंग, रोटेटिंग क्राउन आणि 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्ससारखी फीचर्स आहेत आणि त्यांची किंमतही अनुक्रमे 1749 रुपये आणि 1999 रुपये एवढीच आहे. म्हणजेच, स्वस्तातही तुम्हाला प्रीमियम फील येणार हे नक्की.
“FS1 Pro” वरही विशेष सवलत
थोड्या अधिक फीचर्ससाठी, “FS1 Pro” हे 2799 रुपयांमध्ये मिळणारे घड्याळ निवडता येईल. हे जगातील पहिले 1.96 इंच Super AMOLED डिस्प्ले असलेले Fastrack स्मार्टवॉच आहे आणि त्यात NitraFast चार्जिंग आणि 110 हून अधिक अॅक्टिव्हिटी मोड्ससारखे दमदार फीचर्स मिळतात.
ज्यांना आकर्षक मेटल डिझाईन आणि ‘ऑलवेज ऑन डिस्प्ले’ पाहिजे असेल, त्यांच्यासाठी 2599 रुपयांमध्ये उपलब्ध असलेले “Optimus2 Pro” हे मॉडेल योग्य ठरेल. हे 5 दिवसांपर्यंतची बॅटरी लाइफ देते आणि घड्याळाचा लूक तर कमालच आहे.