जिथे नजर जाईल तिथे सापच साप…, पृथ्वीवरील ‘या’ भागात आढळतात सापांच्या सर्वाधिक प्रजाती! भारत यादीत तिसऱ्या क्रमांकावर

Published on -

आज नाग पंचमीच्या निमित्ताने सापांबद्दल बोलणे अगदी योग्य ठरेल. हे प्राणी जरी अनेकांना भीतीदायक वाटत असले तरी त्यांचा पर्यावरणीय संतुलन राखण्यात फार मोठा वाटा असतो. भारतात नाग पंचमी मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते, आणि सापांच्या पौराणिक महत्त्वामुळे त्यांना पूजलेही जाते. पण एक प्रश्न अनेकांना पडतो तो म्हणजे जगात सर्वाधिक साप कुठे आढळतात?

जगात सर्वाधिक साप आढळणारा देश

तर याचे उत्तर आहे, मेक्सिको. जगातील सर्वाधिक सापांची प्रजाती मेक्सिकोमध्ये आढळतात. तेथे एकूण 438 वेगवेगळ्या प्रजातींचे अस्तित्व नोंदवले गेले आहे. यामध्ये अत्यंत विषारी सापांपासून ते निरुपद्रवी प्रजातींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, या सापांच्या नैसर्गिक अधिवासांमध्ये वाळवंट, वर्षावन आणि खडकाळ किनाऱ्यांचाही समावेश आहे, जे त्यांच्या वाढीस योग्य वातावरण देतात.

मेक्सिकोमधील ‘ट्रॉपिकल वाइन स्नेक’ आणि ‘मेक्सिकन कोरल स्नेक’ या दोन प्रजाती अतिशय धोकादायक समजल्या जातात. हे साप रंग बदलण्यात, झाडांवर चढण्यात आणि खडकांमध्ये लपण्यात कुशल असतात, त्यामुळे ते आपले लक्ष्य सहज पकडतात.

ब्राझील दुसऱ्या नंबरवर

मेक्सिकोनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे ब्राझील. येथे 420 सापांच्या प्रजाती सापडतात. ब्राझीलच्या घनदाट जंगलांमुळे सापांसाठी पोषण, लपण्याची जागा आणि प्रजननासाठी अनुकूल परिस्थिती मिळते.

भारत तिसऱ्या क्रमांकावर

भारताबद्दल बोलायचे झाले तर, येथे सापांची संख्या बरीच आहे, पण जागतिक स्तरावर पाहता भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सुमारे 300 हून अधिक सापांच्या प्रजाती भारतात आढळतात. यामध्ये नाग, धामण, घोणस, वटप, कवड्या आणि अजगर यांचा समावेश होतो.

भारतात सापांची पूजा का केली जाते, याची अनेक कारणं आहेत. पौराणिक कथांमध्ये शेषनाग, वासुकी यांसारख्या सापांचे मोठे महत्त्व आहे. शिवाच्या गळ्यात वसणारा नाग असो की श्रीकृष्णाच्या कालिय मर्दनाची कथा… भारतीय संस्कृतीत सापांचा सन्मानपूर्वक उल्लेख आहे. त्याशिवाय, ज्योतिषशास्त्रात सर्प दोषाच्या निवारणासाठी नाग पंचमीला सापांची पूजा केल्यास पुण्य मिळते असे मानले जाते.

मेक्सिकोमध्ये सापांची संख्या एवढी मोठी असण्यामागे तिथल्या हवामानाची आणि नैसर्गिक विविधतेची मोठी भूमिका आहे. वाळवंट, उष्ण कटिबंधीय जंगलं, उष्ण हवामान, समुद्रकिनारे हे सारे सापांसाठी योग्य अधिवास निर्माण करतात. त्यामुळे तेथे अशा मोठ्या प्रमाणात सापांची प्रजाती टिकून राहिल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!