वयाच्या 25 व्या वर्षी सुरुवात करा आणि 55 व्या वर्षी बना करोडपती, वाचा गुंतवणुकीचा भन्नाट फॉर्म्युला!

Published on -

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण हेच बघतो की, म्हातारपणी आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागू नये. हाच विचार मनात घेऊन बरेचजण काही ना काही बचत सुरू करतात. पण नेमकी सुरुवात कुठून करायची, किती करायची, आणि कधी करायची हे कळेनासं होतं. अशा वेळी “555 फॉर्म्युला” खूपच उपयुक्त ठरतो.

बऱ्याच लोकांना वाटतं, श्रीमंत होण्यासाठी वडिलोपार्जित मालमत्ता असावी लागते, मोठा व्यवसाय असावा लागतो… पण हे खरं नाही. नीट नियोजन, योग्य सवयी, वेळेवर सुरुवात आणि शिस्तबद्ध गुंतवणूक असेल, तर अगदी शून्यावरूनही आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. आणि निवृत्तीनंतर आनंदी जीवन जगू शकतो.

काय आहे “555 फॉर्म्युला”?

हा एक खूप सोपा आणि परिणामकारक गुंतवणूक तत्त्व आहे, जे तीन गोष्टींवर आधारलेलं आहे उत्पन्न, बचत आणि गुंतवणूक. तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी जर गुंतवणुकीची सुरुवात केली आणि दरवर्षी तुमचं गुंतवणुकीचं प्रमाण 5% ने वाढवलं, तर 30 वर्षांच्या सततच्या शिस्तबद्ध गुंतवणुकीनंतर, वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही 5 कोटींहून अधिक रक्कमेचे मालक होऊ शकता.

समजा, तुम्ही 25 व्या वर्षी महिन्याला फक्त ₹10,000 चं SIP सुरू केलं. जर आपण सरासरी 12% परतावा गृहित धरला, तर दरवर्षी तुमची गुंतवणूक 5% ने वाढत जाईल. ही साखळी जर तुम्ही 30 वर्षे खंड न आणता सुरू ठेवली, तर 55 व्या वर्षी तुमची एकूण गुंतवणूक 79,72,662 रुपये होईल. त्यातून मिळणारा परतावा होईल जवळपास 4,47,61,398 रुपये. शेवटी, तुमचं एकूण संपत्ती मूल्य होईल तब्बल 5,27,34,060 रुपये. हे आकडे फक्त अंदाजे आहेत, पण यामागचं तत्त्व अत्यंत परिणामकारक आहे. वेळेवर सुरू करायचं, सातत्य ठेवायचं आणि दरवर्षी थोडं वाढवत जायचं.

सुरुवात कुठून करायची?

25 व्या वर्षी, जेव्हा बहुतांश लोकांचं कौटुंबिक ओझं फारसं नसतं, तेव्हा उत्पन्नाच्या किमान 55% भाग वाचवायचा प्रयत्न करा. त्या पैकी 55% रक्कम म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, रिअल इस्टेट किंवा जमिनीमध्ये गुंतवा. उरलेली रक्कम उत्पन्नाचे इतर स्रोत तयार करण्यासाठी वापरा. यातून तुम्हाला चक्रवाढ परताव्याचा भरघोस फायदा मिळेल.

फक्त SIP किंवा बचतीवर अवलंबून राहू नका. जर तुमच्याकडे मालमत्ता आहे, तर ती भाड्याने द्या. तुम्ही ऑनलाइन कोर्स, ई-कॉमर्स, ब्लॉगिंग, यूट्यूब सारख्या माध्यमातूनही उत्पन्नाचं दुसरं दार उघडू शकता. जसजसं वय वाढतं, तसतशी आरोग्याची काळजी वाढते. त्यामुळे वेळेतच आरोग्यविमा आणि जीवनविमा घेणं फार महत्त्वाचं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!