सुपर डील! Samsung Galaxy A55 5G झाला स्वस्त, सोबतच ₹4,999 चे इअरबड्सही अगदी मोफत

Published on -

सॅमसंग चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खासकरून त्यांच्यासाठी जे एकदम पावसाळ्यात नवीन आणि प्रीमियम फोन घेण्याच्या विचारात आहेत. सध्या Samsung Galaxy A55 5G हा फोन अॅमेझॉनवर एक खास ऑफरमध्ये उपलब्ध आहे, जिथे तुम्हाला फोनसोबत तब्बल ₹10,000 पर्यंतची सवलत आणि जवळपास ₹5,000 किमतीचे इअरबड्सही मोफत मिळत आहेत. सवलतीसोबत असलेली ही डील खरंतर स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते.

Galaxy A55 5G

Galaxy A55 5G हा फोन Samsung च्या A-सिरीजमधील एक मजबूत आणि सर्वाधिक विक्री होणारा मॉडेल मानला जातो. सध्या याचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट अॅमेझॉनवर केवळ ₹29,999 मध्ये मिळतो आहे. लाँचवेळी ह्याच मॉडेलची किंमत ₹39,999 होती. म्हणजेच ग्राहकांना यावर थेट ₹10,000 ची घसघशीत सूट मिळते आहे. इतकेच नाही, तर यासोबत Samsung Galaxy Buds Core हे ₹4,999 किमतीचे इअरबड्सही मोफत मिळत आहेत.

हा फोन ‘ऑसम आइस ब्लू’ आणि ‘ऑसम नेव्ही’ या दोन आकर्षक रंगांमध्ये लाँच करण्यात आला होता. Android 14 वर चालणाऱ्या या फोनला 4 मोठे Android OS अपडेट्स आणि तब्बल 5 वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सची हमी कंपनीने दिली आहे. म्हणजे, फक्त आजच नाही तर पुढच्या काही वर्षांसाठीही हा फोन अप-टू-डेट राहणार आहे.

Galaxy A55 5G ची वैशिष्ट्ये

Galaxy A55 5G मध्ये 6.6 इंचाचा फुल HD+ Super AMOLED डिस्प्ले आहे. याचा 120Hz रिफ्रेश रेट, 1,000 निट्स ब्राइटनेस आणि व्हिजन बूस्टर फीचरमुळे कंटेंट पाहताना डोळ्यांना आराम मिळतो. स्क्रीन गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्लस ने सुरक्षित केलेली असल्यामुळे स्क्रॅचेसपासून संरक्षण मिळते.

प्रोसेसिंग पॉवरबाबत बोलायचं झालं, तर या फोनमध्ये Samsung ने Exynos 1480 चिपसेट दिला आहे, जो वेगवान आणि स्मूथ परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. 8GB RAM आणि 128GB/256GB स्टोरेजच्या कॉन्फिगरेशनमध्ये येणारा हा फोन गेमिंग, मल्टीटास्किंग आणि मीडिया वापरासाठी योग्य आहे.

कॅमेरा

कॅमेराबाबतही सॅमसंगने या फोनमध्ये उत्तम सेटअप दिला आहे.50MP चा मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रावाईड आणि 5MP मॅक्रो लेन्स यासह. तर सेल्फी प्रेमींना 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. त्यामुळे फोटो आणि व्हिडीओ क्वालिटी या रेंजमध्ये जबरदस्त आहे.

बॅटरीबाबत बोलायचे झाले, तर यात 5,000mAh ची दमदार बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगसह येते. एकदा चार्ज केला की दिवसभर वापरात कोणताही त्रास होणार नाही. फोनमध्ये मेटल फ्रेम, IP67 रेटिंगसह पाण्यापासून आणि धुळीपासून संरक्षण, Samsung Knox Vault सारखी सिक्युरिटी आणि फिंगरप्रिंट सेन्सर सारखी अत्याधुनिक फीचर्स दिली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!