सर्वाधिक विक्री होणारा Samsung Galaxy S24 FE तब्बल 24 हजारांनी स्वस्त! पाहा कुठे सुरुये ही भन्नाट डील?

Published on -

जर तुम्ही सॅमसंगचा एखादा मजबूत आणि फीचर्सने भरलेला फ्लॅगशिप फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, पण बजेटमुळे थांबलात, तर सध्या चालू असलेली ही ऑफर तुमच्यासाठीच आहे. कारण सॅमसंगचा लोकप्रिय Galaxy S24 FE 5G फोन सध्या इतक्या मोठ्या सवलतीत मिळतोय की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण वाटेल. तब्बल 24,000 रुपयांहून अधिक सूट मिळत असल्यामुळे, ही डील म्हणजे एकदम “value for money” संधी ठरतेय.

Flipkart वर भन्नाट ऑफर सुरू

या फोनची मूळ किंमत होती 59,999 रुपये. म्हणजे जवळपास 60 हजार. पण सध्या Flipkart वर हीच डिव्हाईस फक्त 35,999 रुपयांना विकली जात आहे. यामध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट उपलब्ध असून, अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डाने खरेदी केल्यास तुम्हाला 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅकही मिळतो. म्हणजे एकंदरित ही किंमत आणखी कमी होते.

त्याचबरोबर, तुमच्याकडे वापरात असलेला जुना फोन असेल, तर त्याच्या एक्सचेंजमध्ये 20,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंटही मिळू शकतो. हा फोन तीन आकर्षक रंगांमध्ये येतो. ब्ल्यू, ग्रेफाइट आणि फ्रेश मिंट. यामधून तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवड करू शकता.

Galaxy S24 FE चे फीचर्स

Galaxy S24 FE मध्ये 6.7 इंचांचा Full HD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz च्या रिफ्रेश रेटसह अगदी स्मूथ अनुभव देतो. गेम खेळताना किंवा ओटीटीवर सिनेमा पाहताना या स्क्रीनचा क्वालिटी अनुभव तुमच्या लक्षात येईल. यात Exynos 2400e डेका-कोर प्रोसेसर आहे जो 4nm तंत्रज्ञानावर आधारित असून, हे प्रोसेसर वेगवान मल्टीटास्किंग आणि परफॉर्मन्ससाठी आदर्श मानलं जातं.

कॅमेराच्या बाबतीतही हा फोन कमी नाही. यात 50MP चा OIS सपोर्टेड प्रायमरी कॅमेरा आहे, जो स्टेबल आणि क्लिअर फोटोसाठी उपयोगी पडतो. त्याचबरोबर 8MP टेलिफोटो लेन्स (3x ऑप्टिकल झूम) आणि 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सरसह एक जबरदस्त ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीप्रेमींसाठी 10MP फ्रंट कॅमेरा चांगलं काम करतो.

AI फीचर्स

पण या फोनचं खऱ्या अर्थानं आकर्षण म्हणजे त्यातील AI फीचर्स. Google च्या सर्कल-टू-सर्च सारख्या सोप्या पण प्रभावी फिचरमुळे स्क्रीनवर दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा तुम्ही लगेच शोध घेऊ शकता. Real-time Live Translate आणि Note Assist यांसारखी AI टूल्स तुमचा रोजचा वापर अधिक स्मार्ट आणि सोपा बनवतात. Interpeter मोडमुळे ट्रॅव्हल करताना भाषेचा अडथळा जाणवत नाही. शिवाय, IP68 रेटिंगमुळे हा फोन पाण्यापासून आणि धुळीपासूनही सुरक्षित असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!