जगातलं सर्वात स्वस्त पर्यटन स्थळ! फक्त ₹1300 रोज खर्च करून परदेश फिरा, ‘हा’ देश बनतोय फेव्हरेट डेस्टीनेशन

Published on -

परदेश प्रवास करायचा म्हणजे हजारो रुपये उडवणं, हेच आपण नेहमी मानत आलो आहोत. पण, जगात एक असं ठिकाण आहे जिथे तुम्ही दिवसभर फिरू शकता, छान जेवू शकता आणि तरी तुमचं रोजचं बजेट 1,200 रुपयेच असेल… विश्वास बसणार नाही ना? पण हे खरं आहे. लाओस आग्नेय आशियात लपलेला एक स्वर्ग, जो परवडण्याच्या बाबतीत जगातल्या सर्व पर्यटन स्थळांमध्ये अग्रेसर मानला जातो.

लाओस देश

लाओस हा देश फक्त सुंदर निसर्गासाठी प्रसिद्ध नाही, तर त्याच्या शांततेसाठी, संस्कृतीसाठी आणि एकंदर अनुभवासाठी ओळखला जातो. भारतातून तुम्ही अगदी सहज आणि स्वस्तात येथे पोहोचू शकता. खास बाब म्हणजे, इथे पोहोचल्यावर राहणं, जेवण, फिरणं सगळंच इतकं किफायतशीर आहे की परदेशात असल्याची जाणीवच होणार नाही. तुम्हाला इथे साधारण हॉटेल्स, गेस्टहाऊस आणि हॉस्टेल्स अगदी 500 ते 700 रुपयांमध्ये सहज मिळतात.

इथलं जेवणही लज्जतदार आणि स्वस्त आहे. रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या स्थानिक स्ट्रीट फूडपासून ते छोट्या बाजारांमधील हॉटेलांपर्यंत, शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचं अन्न सहज आणि कमी पैशात मिळतं. विशेष म्हणजे इथलं जेवण ताजं आणि पौष्टिक असतं, त्यामुळे कमी खर्चातही तुम्ही चवदार अनुभव घेऊ शकता.

वाहतुकीबाबतही लाओस पर्यटकांसाठी खूपच सोयीस्कर आहे. ‘तुक-टुक’ नावाची वाहतूक सेवा इथं फार लोकप्रिय आहे, जी शहरभर फिरण्यासाठी अत्यंत कमी दरात उपलब्ध असते. यामुळे तुम्ही मनसोक्त फिरू शकता, तेही महागड्या टॅक्सीचा विचार न करता.

पर्यटन स्थळ

आता तुम्ही म्हणाल, इतकं स्वस्त तर ठीक, पण पाहण्यासारखं आहे का काही? तर लाओसमध्ये लुआंग प्रबांग, वांग व्हिएंग आणि व्हिएन्टियानसारखी ठिकाणं आहेत, जिथं तुम्हाला गगनचुंबी पर्वत, नितळ पाणी असलेले धबधबे, गुहा आणि प्राचीन मंदिरे पाहायला मिळतील. मेकाँग नदीतलं ‘सी फान डोन’ म्हणजेच सुमारे 4,000 बेटांचा समूह हे तर लाओसचं लपलेलं रत्न आहे. इतकं शांत, सुंदर आणि निसर्गाच्या कुशीतलं की मन पूर्णपणे निवून जातं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!