पृथ्वीवरचा एकमेव देश जिथं कॅलेंडरमध्ये असतात 13 महीने, जगापेक्षा तब्बल 7 वर्षे मागे चालतोय ‘हा’ देश!

Published on -

जगभरात बहुतांश देश एकाच वेळापत्रकानुसार वर्षाची मोजणी करतात. जानेवारी ते डिसेंबर, म्हणजे 12 महिने. पण पृथ्वीवर एक देश असा आहे जो या परंपरेला साफ नकार देतो आणि आपलं स्वतंत्र कॅलेंडर वापरतो तेही 13 महिन्यांचं. इथियोपिया हा असा देश आहे, जो स्वतःची जुनी परंपरा आणि संस्कृती टिकवून ठेवत, इतर जगापेक्षा पूर्णपणे वेगळ्या कालगणनेनुसार चालतो.

इथियोपियातील ‘गीझ कॅलेंडर’

इथियोपियात वापरल्या जाणाऱ्या ‘गीझ कॅलेंडर’मध्ये वर्षभरात 13 महिने असतात. यातील 12 महिने अगदी 30 दिवसांचे असतात आणि 13 वा महिना ‘पॅग्युम’ फक्त 5 किंवा लीप वर्षात 6 दिवसांचा असतो. त्यामुळे त्यांची वेळ मोजण्याची पद्धतच आपल्या जगाच्या मोजणीपेक्षा पूर्ण वेगळी आहे. विशेष म्हणजे, ते आपल्यापेक्षा जवळपास 7 वर्षांनी मागे आहेत. ज्या वर्षी जगभरात कोरोनाचं संकट आलं 2019 त्या वेळी इथियोपियात 2012 वर्ष सुरू होतं.

या अनोख्या देशाचं नवीन वर्षसुद्धा खास आहे. 1 जानेवारी नव्हे, तर 11 सप्टेंबर रोजी ते नवे वर्ष साजरे करतात. या दिवशी त्यांचं ‘मेस्केरेम’ नावाचा पहिला महिना सुरू होतो. हे गीझ कॅलेंडर रोममधील चर्चने 525 मध्ये केलेल्या सुधारणांनंतर तयार झालेल्या ग्रेगोरियन कॅलेंडरला न मानता, जुन्या पद्धतीनेच वेळ मोजत राहिले.

अवघ्या 5 दिवसांचा आठवडा

आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे, इथियोपियन आठवडा हा 7 नव्हे तर 5 दिवसांचा असतो. त्यामुळे त्यांच्या महिन्यात 6 ते 7 आठवडे असतात. अशा वेगळ्या पद्धतीमुळे त्यांचे सण, वेळा, उत्सव सगळे आपल्यापेक्षा वेगळ्या वेळेत साजरे होतात.

इथियोपिया फक्त वेगळ्या कॅलेंडरसाठी प्रसिद्ध नाही. हा देश कॉफीचा जन्मस्थान मानला जातो. जगभरात कॉफीचे चाहते दिसून येतात पण त्याचा उगम इथंच झाला, असं मानलं जातं. त्याचबरोबर, हा एकमेव आफ्रिकन देश आहे ज्यावर ब्रिटनने कधीही सत्ता गाजवली नाही. इटलीने थोडक्याच काळासाठी तिथे आक्रमण केलं होतं, पण इथियोपियन लोकांनी स्वातंत्र्य टिकवून ठेवलं.

हल्ली सोशल मीडियावर इथियोपियाच्या या 13 महिन्यांच्या कॅलेंडरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये आश्चर्य व्यक्त केलं आहे, तर काहींनी इथियोपियाची वेळ मोजण्याची शैली खूपच आकर्षक आणि गूढ वाटल्याचं म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!